Sections

यंदा हापूस आवाक्‍याबाहेरच 

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 27 एप्रिल 2018
hapus_mango

औरंगाबाद - एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शहर व परिसरात आंब्याची आवक सुरू झाली आहे; मात्र वादळी पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक घटली असल्याचे चित्र असून, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात प्रतिदिन सरासरी तीन ते साडेतीन पेट्यांची (चार डझन आंबे) आवक होत आहे. बाजार समितीशिवाय थेट विक्रीसाठी आलेल्या आंब्याची संख्याही तेवढीच आहे. दरम्यान, सर्वच प्रकारच्या हापूसचे दर वधारल्याने ग्राहक गोटी आंबा आणि ‘गोटी’ आणि ‘पायरी’ आंब्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे.   अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शहरात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला होता.

औरंगाबाद - एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शहर व परिसरात आंब्याची आवक सुरू झाली आहे; मात्र वादळी पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक घटली असल्याचे चित्र असून, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात प्रतिदिन सरासरी तीन ते साडेतीन पेट्यांची (चार डझन आंबे) आवक होत आहे. बाजार समितीशिवाय थेट विक्रीसाठी आलेल्या आंब्याची संख्याही तेवढीच आहे. दरम्यान, सर्वच प्रकारच्या हापूसचे दर वधारल्याने ग्राहक गोटी आंबा आणि ‘गोटी’ आणि ‘पायरी’ आंब्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे.   अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शहरात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला होता. अद्यापपर्यंत तरी आंब्याचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आजही आवाक्‍या बाहेरच आहेत. दरम्यान, विक्रीसाठी आलेल्या आंब्यामध्ये रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करण्यात येत असल्याचे बहुतांश ग्राहकांनी सांगितले. देवगड, रत्नागिरी हापूसला ग्राहकांची चांगली मागणी आहे. याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांनी केला आहे. 

यंदा अवकाळी पावसामुळे हापूसची बऱ्यापैकी आवक घटली आहे. दोन-तीन दिवसांपासून बाजारपेठेत दरही वधारले आहेत. कमी आवक असल्यामुळे बाजारपेठेवर थेट परिणाम दिसून यायला सुरवात झाली आहे. येत्या काळात साधारणतः मेमध्ये आवक वाढल्यानंतर दर आवाक्‍यात येतील.-आकाश बद्रोदीन, हापूस विक्रेते.

आंब्याचे दर (डझन) देवगड हापूस आंबा-   ६०० ते ७०० रुपये रत्नागिरी हापूस  - ५०० ते ६०० कर्नाटक हापूस  - २५० ते ३०० गोटी आंबा - १५० ते २०० पायरी - २०० ते ३००

Web Title: hapus mango high rate

टॅग्स

संबंधित बातम्या

आमदार सदानंद चव्हाण हॅट्ट्रिक करणार - उदय सामंत

चिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांचा जनसंपर्क आणि कामाचा आवाका जिल्ह्यातील पाचही आमदारांमध्ये सर्वाधिक असल्याने ते विजयाची हॅट्ट्रिक साधतील....

शेअर बाजार पुन्हा गडगडला

मुंबई: शेअर बाजारात आज (सोमवार) पुन्हा मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 546 अंशांची घसरण नोंदवण्यात आली....

aurangabad
64 व्या कृषी संशोधन समितीच्या बैठकीस सुरवात

औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या (रब्बी हंगाम) 64 वी बैठकीस (झेड आरइएसी,...

mohol
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ

मोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ...

रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता

रत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...