Sections

आगीत चार मुले गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 6 मे 2018
पारुंडी तांडा (ता. पैठण) - घराला लागलेली आग. (दुसऱ्या छायाचित्रात) संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

आडूळ - विद्युत तारांच्या घर्षणामुळे घराला आग लागल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. पाच) सायंकाळी पाचच्या सुमारास पारूंडी तांडा (ता. पैठण) येथे घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. 

पारूंडी तांडा येथील विठ्ठल श्रीचंद राठोड यांच्या घराच्या एका बाजूला किराणा, तर दुसऱ्या बाजूला कापड दुकान आहे. शनिवारी दुकानात बसले असताना सायंकाळी त्यांच्या घरातून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी हे पाहून आरडाओरड करीत घराकडे धाव घेतली व घरातील वीजपुरवठा बंद केला. 

आग आटोक्‍यात आणण्यासाठी त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा रवी राठोड (वय १८), हरीश राठोड (१७), कुशाल चव्हाण (वय १६), जितेंद्र राठोड (१४) हे घरातील आग विझविताना गंभीररीत्या भाजले.  आगीची तीव्रता एवढी भयानक होती, की रवी राठोड याच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला होता. नागरिकांनी त्यांना घराबाहेर ओढून आग विझवून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेले. तांड्यावरील ग्रामस्थांनी पाण्याने आग आटोक्‍यात आणली. या आगीत घरातील टीव्ही, कपाट, फॅन, फर्निचर, कपडे यासह महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.

जीवितहानी टळली आग लागली त्या वेळी विठ्ठल राठोड यांची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती. याच घरात स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर होता; मात्र सुदैवाने यात सिलिंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

Web Title: four boys injured in fire

टॅग्स

संबंधित बातम्या

Power crisis due to lack of coal in chandrapur
कोळशाअभावी वीज कपातीचे संकट; एक दिवसाचा साठा शिल्लक

चंद्रपूर : कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्र संकटात सापडले आहे. केवळ एक दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे....

Samruddhi-Highway
समृद्धी महामार्गालगत ‘हायटेक’ सुविधांची चाचपणी

औरंगाबाद - समृद्धी महामार्गालगत तयार करण्यात येत असलेल्या ‘युटिलिटी कॉरिडॉर’मधून सुविधांची चाचपणी करण्यासाठी एमएसआरडीसीने ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ (...

मराठा क्रांती पक्ष राज्यात सक्षम पर्याय ठरेल - सुरेशदादा पाटील

रत्नागिरी - सत्ताधारी व विरोधकांनी निवडणुकीत मराठा समाजाचा उपयोग करून घेतला; पण आरक्षण दिले नाही. त्यामुळे मराठा व्होट बॅंकेची बांधणी आतापासून...

वीज दरवाढीमुळे ५२ संस्था अवसायनात

कुडित्रे - स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पाणीपुरवठा संस्थांचे बीज सहकारातून रोवले गेले. पाणीपुरवठा संस्थांमुळे जमीन सिंचनाखाली येऊन पश्‍चिम...

मागासवर्गीय पदोन्नती रखडली 

मुंबई : सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना आरक्षणाच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचा निर्देश सवोच्च न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने...