Sections

देव्हाऱ्यात भाजलेल्या महिलेचा मृत्यू 

प्रल्हाद कांबळे |   सोमवार, 7 मे 2018
Death of the woman who burns a fire

नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे राहणारी धुरपताबाई बळीराम पवळे (वय 86) ही वृध्द महिला आपल्याच देवघरात देवांची पूजा अर्चा करीत होती. परंतु पेटलेल्या दिव्यावर तीचा पदर पडून पदराने पेट घेतला.

नांदेड - घरातील देव्हाऱ्यात पुजा करीत असतांना पेटलेल्या दिव्यावर पदर पडल्याने गंभीर भाजलेल्या महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मरवाळी (ता. नायगाव) येथे शुक्रवारी (ता. 1) रोजी घडली होती. 

नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे राहणारी धुरपताबाई बळीराम पवळे (वय 86) ही वृध्द महिला आपल्याच देवघरात देवांची पूजा अर्चा करीत होती. परंतु पेटलेल्या दिव्यावर तीचा पदर पडून पदराने पेट घेतला. काही समजण्याच्या आतच तिच्या अंगावरील साडीने पेट घेतल्याने ती गंभीर भाजल्या गेली. नातेवाईकांनी सर्वप्रथम नायगाव ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर बनल्याने तिला नांदेच्या शासकिय रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असतांना शनिवारी (ता. 5) दुपारी साडेचार वाजता तिचा मृत्यू झाला. देवाची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा भाजल्याने मृत्यू झाला. तिला देवही वाचवू शकला नसल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी रूग्णालयीन पोलिस कर्मचारी आर. जे. बायस यांच्या माहितीवरुन नायगाव ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. वळगे हे करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Death of the woman who burns a fire

टॅग्स

संबंधित बातम्या

लाखोंचा ऐवज चोरणाऱ्या नेपाळच्या चोरट्यांना अटक 

पुणे : एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांसह 35 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या नेपाळ येथील चोरट्यांना गुन्हे शाखेच्या...

पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेने पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करून सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा...

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

तुर्काबादला किराणा दुकान फोडून 10 हजारांची चोरी

लिंबेजलगाव : तुर्काबाद खराडी (ता.गंगापुर, जि. औरंगाबाद ) येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडुन साहित्यासह 10 हजार रुपये चोल्याची घटना शनिवारी (ता.17)...

44crime_logo_525_1.jpg
शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्‍टरवर गुन्हा 

पिंपरी : शरीर सुखाची मागणी मान्य न केल्यास एका 36 वर्षीय महिलेला बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टराच्या...