Sections

सेनादलांच्या अडचणींवर उपाय शोधा, बक्षिसे जिंका 

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 26 मार्च 2018
indian army

हेलिकॉप्टरसाठीचे इजेक्‍शन मेकॅनिझम, डोंगराळ भागात उडताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कमकुवत किंवा कार्यरत नसलेल्या जीपीएस यंत्रणे शिवाय चालू शकणारी यंत्रणा, युद्धजन्य परिस्थितीत आपल्यासोबतच्या साथीदाराचे ठिकाण, माहिती देणारी यंत्रणा, ड्रोन ओळखण्याच्या पद्धती हे विषय या स्पर्धेसाठी आहेत

औरंगाबाद - सेना दलांना येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्याचे आवाहन देशभरातील नागरिकांना करण्यात आले आहे. त्यासाठी "सोल्युशन टू प्रॉब्लेम' या खुल्या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले असून, यात बाजी मारणाऱ्यांना एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. 

चेन्नईत 11 ते 14 एप्रिलदरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित "डिफेन्स एक्‍सपो 2018' च्या निमित्ताने आयोजित "सोल्युशन टू प्रॉब्लेम' या खुल्या स्पर्धेच्या माध्यमातून सेनादलांच्या अडचणींवर तोडगे मागवण्यात आले आहेत. हे तोडगे पॉवर पॉईंट सादरीकरण, मजकुरांसह वैयक्तिक किंवा सांघिक पद्धतीने सादर करता येणार आहेत.

हेलिकॉप्टरसाठीचे इजेक्‍शन मेकॅनिझम, डोंगराळ भागात उडताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कमकुवत किंवा कार्यरत नसलेल्या जीपीएस यंत्रणे शिवाय चालू शकणारी यंत्रणा, युद्धजन्य परिस्थितीत आपल्यासोबतच्या साथीदाराचे ठिकाण, माहिती देणारी यंत्रणा, ड्रोन ओळखण्याच्या पद्धती हे विषय या स्पर्धेसाठी आहेत. एक पान बायोडाटा आणि ओळखपत्रांसह आपला प्रोजेक्‍ट defplg@defexpoindia.in वर 8 एप्रिलच्या आत दुपारी बारापर्यंत पाठवणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी www.defexpoindia.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: competition to suggest remedies for problems in indian armed forces

टॅग्स

संबंधित बातम्या

आता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी

चंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...

महिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे!

मुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...

ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न मार्गी 

सातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश...

Ananth Kumar
भाजपचा दक्षिणेतील चेहरा हरपला; अनंत कुमार यांचे निधन

बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे...

मूळ कागदपत्रे दाखविण्याची सक्ती मागे 

पुणे - नॅशनल परमिट असलेल्या ट्रकला दोन चालकांची सक्ती केंद्र सरकारने रद्द केली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या नव्या आणि आठ वर्षांच्या आतील...