Sections

‘ऑरिक’मध्ये सर्वसामान्यांसाठी  १५ एकरांत वसाहत

आदित्य वाघमारे |   रविवार, 18 मार्च 2018

औरंगाबाद - औद्योगिक वसाहत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये (ऑरिक) आता नागरी वसाहत वसविली जाणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारी अशी १५ एकरांतील नागरी वसाहत उभारण्यासाठी पावले टाकायला प्रशासनाने सुरवात केली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्याच्या पाच वर्षांत ही सुविधांनी युक्त वसाहत उभी करण्यात येणार असल्याचे ऑरिक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

औरंगाबाद - औद्योगिक वसाहत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये (ऑरिक) आता नागरी वसाहत वसविली जाणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारी अशी १५ एकरांतील नागरी वसाहत उभारण्यासाठी पावले टाकायला प्रशासनाने सुरवात केली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्याच्या पाच वर्षांत ही सुविधांनी युक्त वसाहत उभी करण्यात येणार असल्याचे ऑरिक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत सुरू असलेल्या ऑरिकमध्ये औद्योगिक भूखंडांवर कंपन्यांच्या उभारणीसह आता रहिवासी वसाहतीही उभारल्या जाणार आहेत. १५ एकर जागेवर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील घरे उभारणीसाठी बांधकाम व्यावसायिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सर्वसामान्यांसाठी साडेसहाशे चौरस फूट (६० चौरस मीटर) मापाच्या घरांची वसाहत उभी केली जाणार आहे. ही वसाहत सर्व सुविधांसह करार करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने तयार करण्याचे यात बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी इच्छुकांना आपल्या प्रकल्पाचा अहवाल सादर करावा लागणार असून, त्याच्या उभारणीसाठीची किंमत, घरांची संख्या, सुविधांची माहितीही त्यात नमूद करावी लागणार आहे. ३,२०० रुपये प्रतिचौरस मीटर मोकळ्या जागेची किमान किंमत राहणार असून, पंतप्रधान आवास योजनेचा लाभही या प्रकल्पात दिला जाणार असल्याचे ‘ऑरिक’तर्फे काढण्यात आलेल्या प्रस्तावात नमूद आहे. 

Web Title: aurangabad news Aurangabad Industrial City marathwada midc

टॅग्स

संबंधित बातम्या

'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'

औरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...

गिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला : उच्च न्यायालय

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे...

राज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये 

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली...

live photo
बॉम्बच्या अवफेवे पळविली कारागृहातील यंत्रणा 

धुळे ः शहरातील मध्यवर्ती भागातील जिल्हा कारागृहात दोन- तीन बॉम्ब असल्याची माहिती आज दुपारी नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिस विभाग हादरला. शहर पोलिसांसह...

patil
मुख्याधिकारी रामदास पाटील यांची अमेरिका दौऱ्यासाठी निवड

हिंगोली : येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची राज्य शासनाच्या शिफारशीवरून अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तेथे कॅलीफोर्निया...

nevasa
शंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट

नेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...