Sections

बबन चित्रपटात शेगावची 'प्रांजली'

श्रीधर ढगे |   सोमवार, 16 एप्रिल 2018
pranjali

खामगाव : 'ख्वाडा' चे प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'बबन' या मराठी चित्रपटात शेगाव येथील प्रांजली कंझारकर हिला सहकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा अनुभव खूप आनंददायी राहिला असं प्रांजली हिने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

खामगाव : 'ख्वाडा' चे प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'बबन' या मराठी चित्रपटात शेगाव येथील प्रांजली कंझारकर हिला सहकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा अनुभव खूप आनंददायी राहिला असं प्रांजली हिने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

मराठीत अलीकडे दर्जेदार चित्रपट येत आहेत. सैराट सारख्या चित्रपटाने तर रेकॉर्ड ब्रेक व्ययसाय केला. आर्ची व परशा हे दोन स्टार सिने जगताला दिले. ग्रामीण भागातील नव्या चेहऱ्यांना संधी देवून चित्रपट काढण्याचा ट्रेंड आता सुरू झाला आहे. नागराज, भाऊराव कऱ्हाडे हे प्रयोगशील व वेगळ्या वाटेने जाणारे दिग्दर्शक नव्या चेहऱ्यांना चंदेरी दुनियेत करिअरची संधी देत आहेत. भाऊराव कऱ्हाडे यांचा 'बबन' सिनेमा असाच नव्या कलाकारांना घेऊन बनविण्यात आला. 

या चित्रपटातील "कस्सं ..बबन म्हणेल तस्सं ..." हा डायलॉग हिट ठरलेला हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मुख्य कलाकार व सहकलाकार आपल्या अभिनयाची छाप पाडून गेले. 'बबन'मध्ये गायत्री जाधव (कोमल) ही नायिका आहे. तिची मैत्रीण म्हणून भूमिका करण्याची संधी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील प्रांजली पुरुषोत्तम कंझारकार हिला मिळाली. प्रांजली पुण्याच्या रायसोनी कॉलेजमध्ये सिव्हील इंजनिअरिंग करते. 'बबन'बाबत ती म्हणाली. " बबन हा चित्रपट खूपच छान आहे. पाहताना तुम्ही खूप एन्जॉय कराल. माझी भाऊंशी ओळख झाली. मोजक्या लोकांना ओडिशनला बोलवलं होतं, त्यात माझी निवड झाली. मला कोमलच्या मैत्रिणीची भूमिका मिळाला. माझा अभिनय प्रेक्षकांना आवडला. बबन मधील सर्वच पात्र मनाला भिडतात. भाऊंच्या लिखाणात दम असल्याने हा सिनेमा दर्जेदार झाला असेही असेही प्रांजली म्हणाली.

प्रांजलीने बबन मधील नायिका कोमलची मैत्रीण सारिकाची भूमिका केली. चित्रपटातील गाणी व अन्य प्रसंगात तिला अभिनयाची संधी मिळाली. प्रांजलीचे वडील सर्वसामान्य कुटुंबातील असून, तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. २१ मार्चला बबन महाराष्ट्रात तर नुकताच सिंगापूरमध्ये प्रदर्शित झाला. ग्रामीण जीवन आणि ग्रामीण कलाकारांना संधी असलेला बबन सर्वांना आवडेल असे प्रांजली म्हणाली.

Web Title: shegaon's pranjali in baban movie

टॅग्स

संबंधित बातम्या

गणेशभक्त देणार श्रींना भावपूर्ण निरोप 

पुणे : मंगलमय चैतन्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची उद्या (ता.23) सांगता होत आहे. भक्तांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले आहेत. श्रींना वाजत गाजत निरोप...

ramakant gaikwad
जगणं कलेशी एकरूप झालं पाहिजे... (रमाकांत गायकवाड)

गायनकलेबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं की कुठलीही कला "असरदार' होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी त्या कलाकाराला स्वतःचं जीवन त्या कलेशी...

dr shrikant karlekar
परतीचा विलंबित प्रवास... (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी...

bhagyashree bhosekar-bidkar
छोटासा घर होगा... (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)

मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर शोधणं आणि मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट. "लव्ह पर स्क्वेअर फीट' ही वेब सिरीज त्यावर भाष्य करते. एकीकडं घराचा शोध आणि...

सोमवारी राज्यभरात पावसाची शक्‍यता 

मुंबई : राज्यभरात अनेक दिवसांपासून दडी मारलेला वरूणराजा सोमवारपासून पुन्हा बरसणार आहे. सध्या विदर्भात सुरू असलेला पाऊस सोमवारपासून पुढील दोन...