Sections

'बबन'ने गाठले थेट सिंगापुर

टीम ई सकाळ |   रविवार, 15 एप्रिल 2018
The screening of Baban will be held in Singapore

आज 15 एप्रिल ला सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी 'बबन'ची ही भलीमोठी स्क्रिनिंग आयोजित केली जाणार आहे. 

'कस्संं?...बबन म्हणेन तसं' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावणाऱ्या, तसेच सलग चौथ्या आठवड्यातदेखील हाऊसफुल ठरत असलेल्या 'बबन'ने आता थेट सिंगापूर गाठले आहे. सिंगापूरच्या मराठी सिनेरसिकांनादेखील या सिनेमाचे आस्वाद घेता यावा, यासाठी तेथील स्थानिक प्रेक्षकांकडून 'बबन'च्या या खास स्क्रीनिंगची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आज 15 एप्रिल ला सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी 'बबन'ची ही भलीमोठी स्क्रिनिंग आयोजित केली जाणार आहे. 

ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. 'बबन' सिनेमातील संवाद आणि गाण्यांनादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनदेखील प्रेक्षकांच्या डोळ्यात घालत आहे. तसेच, वर्षाच्या मध्यान्हात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमाच्या यादीत 'बबन'चा समावेश झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' चा हा गावराण बाणा सिंगापूरमध्येदेखील आपली कमाल दाखवणार हे निश्चित!

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The screening of Baban will be held in Singapore

टॅग्स

संबंधित बातम्या

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

Raj Thackeray greets Manmohan Singh on his birthday
माझ्या सकट, भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव भासते- राज ठाकरे

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना आपल्या खास शैलीत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राज...

मनसे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

डोंबिवली : मनसेे नेते प्रमोद (राजू ) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहराच्या वतीने बुधवारी डोंबिवली शहरात...

मिठाने पाडतो पाऊस, संशोधक डॉ. राजा मराठे यांचा दावा 

औरंगाबाद - खोळंबलेले ढग पाऊस रुपाने खाली आणण्यासाठी संशोधक डॉ. राजा मराठे यांनी यशस्वी प्रयोग केले आहेत. अवघे दोन टायर जाळून त्यावर पन्नास किलो मिठ...

shrigonda police station
महिलेस विवस्त्र करून मारहाण: पोलिसांची भूमिका संशयास्पद

नगर : श्रीगोंदे तालुक्यातील भाणगाव येथे महिलेला विवस्त्र करून मारहाण झाली असल्याचा व्हिडिओ असूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे प्रथमदर्शनी...