Sections

सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 23 एप्रिल 2018
Sai Tamhankar will involved in shramdan on maharashtra din

सई गेली तीन वर्ष पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पाणीटंचाईविरहित महाराष्ट्रासाठी आपलं योगदान देते आहे.

महाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात येत्या 1 मे ला श्रमदान करणार आहे. सई गेली तीन वर्ष पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पाणीटंचाईविरहित महाराष्ट्रासाठी आपलं योगदान देते आहे. यंदाही आपल्या बाकी सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्यांना बाजूला ठेवतं, सई श्रमदानामध्ये 1 मे ला सक्रिय सहभागी झालेली दिसणार आहे.

सई ताम्हणकरला ह्याविषयी विचारले असता ती म्हणते, “मी हे स्वानुभवाने सांगु शकते, की, रणरणत्या उन्हात श्रमदान करताना आपला घाम जेव्हा मातीत मिसळतो. तेव्हा मातीच्या येणाऱ्या सुगंधाची बरोबरी कोणताही महागडा परफ्युम करू शकणार नाही. त्यामुळेच पाणी फाउंडेशन जेव्हा जेव्हा श्रमदानासारखे उपक्रम आयोजित करतं, तेव्हा त्यात सक्रिय सहभाग घेणं, ही माझ्यासाठी प्राथमिकता असते.”

तिच्या श्रमदानाच्या अनुभवाबद्दल सई सांगते “पाणी फाउंडेशनसाठी मी गेल्या तीन वर्षात पश्चिम महाराष्ट्र फिरले आहे. एकदा एक सरपंच मला हातात कुदळ-फावडा घेऊन काम करताना पाहून प्रतिक्रिया देत म्हणाले होते की, मी आजपर्यंत कुठल्याच हिरोइनला पाण्यासाठी आमच्या गावात येउन काम करताना पाहिलं नव्हतं. ह्या प्रतिक्रियेने माझा काम करण्याचा हुरूप अजूनच वाढला.”

ती पुढे म्हणते, “आपल्यात पध्दत आहे, ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणायची. जर आपल्या अन्नदात्याला, शेतकऱ्याला खरंच सुखी करायचं असेल, तर सुरूवात श्रमदान करून त्याच्या शेतीला मुबलक पाणी पोहोचवण्यापासून करायला हवी.”

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Sai Tamhankar will involved in shramdan on maharashtra din

टॅग्स

संबंधित बातम्या

nashik
सुळे डाव्या कालव्याचे खामखेडा येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते जलपूजन

खामखेडा (नाशिक) - पत्तीस वर्षांपूर्वी सुळे डाव्या कालव्याची मंजुरी व प्रत्यक्ष काम होवून दहा वर्ष ओलांडली होती. ३७ किमी कालवा होऊन त्या टप्प्यात...

manmad.
मनमाड - जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारल्याने रेल्वेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी 

मनमाड - पाणीटंचाईचे शहर असलेल्या मनमाडमध्ये रेल्वे प्रशासनाने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारल्याने रेल्वेच्या...

गौरी लंकेश हत्या प्रकरणः जालन्यातील पांगरकर एसआयटीच्या ताब्यात

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने महाराष्ट्रातील जालना येथून संशयित श्रीकांत पांगरकर याला ताब्यात घेतले. तो शिवसेनेचा...

Dhol-Tasha
#BappaMorya ग्रामीण पथकांनी आणला मिरवणुकीत जोश

ग्रामीण भागात पूर्वी मनोरंजनाची साधने मर्यादित होती. दिवसा शेतीची कामे करून मंडळी सायंकाळी घराकडे परतत. रात्रीच्या जेवणानंतर गावातले वयस्क मारुतीच्या...

ऐक्‍याच्या प्रतीकाची ओळख ‘मराठ्यांचा पीर’

सावंतवाडी - हिंदू, मुस्लिम धर्मीयांच्या ऐक्‍याचे प्रतीक अशी येथील सरदार निंबाळकर पिराची ओळख आहे. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेला हा पीर...