Sections

न्यूड : स्त्री-धाडसाची अपारंपरिक कहाणी 

संतोष भिंगार्डे  |   शनिवार, 28 एप्रिल 2018
nude

"न्यूड' या नावामुळे काही जणांनी त्याच्याविषयीची आपली (पूर्वग्रहदूषित) मतं बनवायला सुरुवात केली होती. चित्रपटामध्ये काय असणार, याबद्दल काही जणांनी आपल्या मनातल्या मनात अंदाज आणि आखाडे बांधलेले होते...

आपल्या चित्रपटांच्या वेगळ्या विषयामुळे दिग्दर्शक रवी जाधव ओळखला जातो. "नटरंग', "टाईमपास', "बालक पालक' अशा त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्याची वेगळी शैली दिसली. त्याच्या बहुतेक चित्रपटांनी (अपवाद वगळता) बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचा "न्यूड'ही त्याच्या शैलीतला चित्रपट आहे. 

nude

"न्यूड' या नावामुळे काही जणांनी त्याच्याविषयीची आपली (पूर्वग्रहदूषित) मतं बनवायला सुरुवात केली होती. चित्रपटामध्ये काय असणार, याबद्दल काही जणांनी आपल्या मनातल्या मनात अंदाज आणि आखाडे बांधलेले होते. त्यातच हा चित्रपट "इफ्फी'सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून बाहेर फेकला गेल्यामुळे चर्चेला आणखीन उधाण आले होते. पारंपरिक चौकटीत अडकलेल्या काही जणांनी या चित्रपटाबद्दल काहीसा आकस बाळगला होता. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर रवीने काही तरी नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला आहे, हे निश्‍चित जाणवते. पारंपरिक चौकटीबाहेर डोकावणारा हा चित्रपट आहे. व्यावसायिक चित्रपटाची चौकट मोडणारा आणि कलात्मकतेला नवीन आयाम देणारा हा चित्रपट आहे. 

चित्रपटाची कथा एका गावातून सुरू होते. यमुनाबाई (कल्याणी मुळ्ये) ही अत्यंत गरीब असते. तिला एक मुलगा असतो. तो शिक्षण घेत असतो. तिचा नवरा सतत दारू पिऊन तिला मारहाण करीत असतो. त्यामुळे त्याच्या मारहाणीला कंटाळून यमुनाताई थेट मुंबईला चंद्राक्का (छाया कदम) यांच्याकडे येतात. ही चंद्राक्का धीट आणि तितकीच कणखर बाई असते. तिचाही नवरा असतो; पण तो काहीही कमावीत नसतो. त्यामुळे चंद्राक्का एका ठिकाणी नोकरी करून आपले घर सांभाळीत असते. चंद्राक्काने आपल्याला कुठे तरी नोकरी लावावी, अशी इच्छा यमुनाबाईंची असते. कारण यमुनाबाईला तिच्या मुलाला शिकवायचे असते.

एके दिवशी यमुनाबाई चंद्राक्काचा पाठलाग करते आणि चंद्राक्का नेमके काय काम करते हे तिला समजते. चंद्राक्का सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी न्यूड आर्टिस्ट म्हणून काम करीत असते. खरे तर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना एखादा पुरुष किंवा स्त्री यांचे नग्न छायाचित्र रेखाटणे हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. मात्र त्यांच्या मनात कसलीही वासना किंवा भावना नसते.

न्यूड मॉडेल मिळणे दुरापास्त असते म्हणून घरच्या गरिबीमुळे आपल्याला हे काम करावे लागले, असे ती यमुनाबाईला सांगते. आपल्यामुळेच ही मुले शिकतात, आपण त्यांच्या शिक्षणाला हातभार लावतो, हेही तिला पटवून देते. मग नाइलाजास्तव मुलाच्या भविष्यासाठी मनावर दगड ठेवून यमुनाबाई हे काम करायला तयार होते. त्यानंतर सुरू होतो तिचा एक संघर्ष... 

दिग्दर्शक रवी जाधवने अशा प्रकारचा वेगळा विषय हाताळण्याचे धाडस केले आहे. त्याला कलाकारांच्या अभिनयाची चांगली साथ लाभली आहे. छाया कदम, कल्याणी मुळ्ये, मदन देवधर, ओम भुतकर आदी कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. यमुनाबाईची मनातल्या मनात होणारी घालमेल... तिची द्विधा अवस्था...तिच्या एकूणच भावभावना आपल्या डोळ्यांतून कल्याणीने छान व्यक्त केल्या आहेत. तिच्या अभिनयाला दाद द्यावीच लागेल. नसीरूद्दीन शाह यांची छोटीशी एन्ट्री बरेच काही सांगून जाणारी आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. सचिन कुंडलकर यांची पटकथा आणि संवाद फक्कड झाले आहेत. मात्र चित्रपटाचा शेवट मनाला पटत नाही. त्याबाबतीत दिग्दर्शकाने वेगळा विचार करणे आवश्‍यक होते. 

आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या मनावर दगड ठेवणाऱ्या एका आईची ही कथा आहे. मनाला चटका लावणारी एका कणखर आणि धाडसी स्त्रीची ही कहाणी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. 

Web Title: review of marathi movie nude

टॅग्स

संबंधित बातम्या

Katie with children
दत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ!

न्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना...

nana-patekar
...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी  

कऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...

Devendra_Fadnavis
बाळासाहेबांचा रिमोट आवडला असता : फडणवीस

मुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "रिमोट कंट्रोल'...

घारेवाडी - दोन मिनिटांच्या वक्तृत्वात समृद्धी जाधवांनी नाना पाटेकरांचे मन जिंकल्याने त्यांनी मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली.
...अन्‌ नानांनी मारली समृद्धी जाधवांना मिठी!

कऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले....

बावधन बुद्रुक - मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेते प्रवीण तरडे यांचा सन्मान करताना (डावीकडून) बबन दगडे, विनोद माझिरे, सत्यवान उभे, अशोक मोहोळ, किरण दगडे, प्रवीण तरडे, विठ्ठल तरडे, रखमाबाई तरडे, निर्मलाताई दानवे.
मुळशीनंतर आता वाळू पॅटर्न - प्रवीण तरडे

बावधन - मुळशी तालुका वारकऱ्यांचा, कुस्तीगीरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्‍याची ओळख जगभर पोचवायची आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित...

पु. ल. देशपांडे रंगमंच, सिटी प्राइड कोथरूड - ‘दिठी’ चित्रपटाचे कलाकारांशी संवाद साधताना समर नखाते. यावेळी (डावीकडून) पार्थ उमराणी, डॉ. मोहन आगाशे, सुमित्रा भावे, धनंजय कुलकर्णी.
‘दिठी’, ‘धप्पा’ आणि ‘खटला-बिटला’चे किस्से

पुणे - ‘आजूबाजूला असणारे, घडणारे विषय घेऊनच मी चित्रपट करतो. मग त्या विषयांमध्ये थोडा नर्मविनोदीपणा आणण्याचा प्रयत्न करतो,’ असे दिग्दर्शक परेश मोकाशी...