Sections

'वतन के आगे कुछ नहीं..मै भी नहीं' - Raazi ट्रेलर

टीम ई सकाळ |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
raazi

भारतातले एक काश्मिरी वडील आपल्या मुलीला गुप्तहेरी करण्यासाठी तिचे लग्न करून पाकिस्तानात पाठवतात. जिला यासंबंधी काही माहिती नसते. तेथील सर्व खाजगी व महत्त्वाची माहिती भारताला पुरविण्याचे काम तिच्याकडे असते. भारताचे कान व डोळे बनून राहण्याची सूचना तिला दिली जाते.

मुंबई : बबली अभिनेत्री आलिया भट ही कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडण्यात अग्रेसर आहे. आता ती दिसणार आहे अॅक्शन थ्रिलर भूमिकेत. 'राझी' या सिनेमाच्या नुसत्या ट्रेलरनेच प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. आलिया या सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसेल. आलिया सहमत असे तिच्या भूमिकेचे नाव आहे.  

‘जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन्स’ची निर्मिती असलेला 'राझी' हा देशभक्तीवरचा सिनेमा असला, तरी त्याचे कथानक हे हटके आहे. भारतातले एक काश्मिरी वडील आपल्या मुलीला गुप्तहेरी करण्यासाठी तिचे लग्न करून पाकिस्तानात पाठवतात. जिला यासंबंधी काही माहिती नसते. तिच्या पतीची भूमिका विकी कौशल या अभिनेत्याने साकारली आहे. तो पाकिस्तानी अधिकारी असतो. तेथील सर्व खाजगी व महत्त्वाची माहिती भारताला पुरविण्याचे काम तिच्याकडे असते. भारताचे कान व डोळे बनून राहण्याची सूचना तिला दिली जाते. त्याप्रमाणे ती पुढील कारवाया कशा करते हे सिनेमातच बघणे औत्सुक्याचे ठरेल.

राझीच्या ट्रेलरमधला 'वतन के आगे कुछ नहीं..मै भी नहीं' हा डायलॉग सध्या चांगलाच गाजतोय. 

raazi

ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवरून या राझी या सिनेमाचे कथानक घेतले आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी नेहमीप्रमाणे एक उत्तम सिनेमा द्यायचा प्रयत्न केला आहे हे या ट्रेलरवरून कळते. या आधी त्यांनी 'तलवार' सारखा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचे चित्रीकरण कश्मीर, पंजाब आणि मुंबईमध्ये झाले असून येत्या ११ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.     

Web Title: raazi movie trailer launch

टॅग्स

संबंधित बातम्या

जीन्स, टी-शर्ट 'असभ्य' पेहराव ; अमृतसर महाविद्यालय

अमृतसर : महाविद्यालयात जीन्स, टी-शर्ट, स्कर्ट आणि केप्रिस परिधान करणे हा 'असभ्य' पेहराव असल्याचे सांगत पंजाबच्या अमृतसर वैद्यकीय...

Rs 30000 cr given to man with no skill in making aircraft says Rahul
रिलायंसला कंत्राट देणे हीच कुशल भारताची ओळख- राहुल गांधी

नवी दिल्ली- राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. आता त्यांनी...

borivali
संजय गांधी नॅशनल पार्कमधील रस्त्यांवर कुंपण घाला 

मुंबई : बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी रस्त्यावर येत असल्याने अनेक अडचणी येतात होते. त्यामुळे उद्यानातील रस्त्यांवर कुंपणच घाला, अशी...

saina nehwal
बॅडमिंटनपटू साईना नेहवाल अडकणार विवाहबंधनात

हैदराबाद : भारताची फुलराणी साईना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 16...

Former Prime Minister Of India Dr Manmohan Singhs Birthday Special
Happy Birthday Dr Singh : वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ. मनमोहन सिंग यांचा उत्साह कायम

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 86 वा जन्मदिवस आहे. वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात त्यांचा उत्साह कायम आहे. डॉ....