Sections

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'परमाणु'चा टिझर रिलीज

टीम ई सकाळ |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
Parmanu Hindi Movie Teaser Out Today

मुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला झालेल्या अणुचाचणीवर आधारीत सिनेमाचे कथानक आहे. 

मुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला झालेल्या अणुचाचणीवर आधारीत सिनेमाचे कथानक आहे. 

या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सतत लांबणीवर जात होती. काही वादविवादांच्या भोवऱ्यातही सिनेमा सध्या अडकला आहे. सिनेमा निर्माती प्रेरणा अरोरा यांच्या क्रिअर्ज प्रॉडक्शन हाऊस कंपनीने जॉन अब्राहम विरोधात फसवणूक, पैशांची अफरातफर, कॉपीराईटचे उल्लंघन या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. जॉनने सिनेमाच्या नफ्याचा 50 टक्के भाग घेतल्यानंतर करार रद्द केला आहे, असा आरोप प्रेरणा अरोराने केला आहे. या प्रकरणात पोलिस लवकरच जॉनची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा लांबली आहे. 

 

बऱ्याच कालावधीनंतर जॉन अब्राहमचा 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याचा हा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. For #news visit www.esakal.com #hindimovie #bollywood #Parmanu #star @thejohnabraham @dianapenty

A post shared by eSakal (@esakalphoto) on Apr 6, 2018 at 1:37am PDT

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 8 डिसेंबर 2017 निश्चित करण्यात आली होती. पण 1 डिसेंबरला 'पद्मावत' प्रदर्शित होणार असल्याने हा सामना टाळण्यासाठी जॉनच्या टीमने रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवी तारीख 2 मार्च ठरवण्यात आली. पण यावेळी देखील अनुष्का शर्माच्या 'परी'सोबत सामना होणार होता. त्यामुळे क्रिअर्जने सिनेमाची तारीख पुन्हा बदलून आता 4 मे ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Parmanu Hindi Movie Teaser Out Today

टॅग्स

संबंधित बातम्या

Marathi Movie Review Savita Damodar Paranjape By Hemant Juvekar
सविताचं यशस्वी माध्यमांतर!; 'सविता दामोदर परांजपे'

एकांकिकेचं नाटक होणं यात आता फारसं नाविन्य राहिलेलं नाही. नाटकाचा सिनेमा होणं यात मात्र ते आहे. सविता दामोदर परांजपे या सिनेमाबद्दल म्हणूनच प्रचंड...

Film-Industry
सभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे...

सचिन तेंडुलकर करणार रेल्वे प्रवाशांत जागृती 

मुंबई - पश्‍चिम रेल्वेने रूळ ओलांडण्यातील धोके, महिला प्रवासी सुरक्षा व स्वच्छता या गंभीर मुद्द्यांवर विशेष जागरूकता अभियान राबवले आहे. याचा...

Satyamev Jayate Trailer Out
पावरपॅक 'सत्यमेव जयते'चा ट्रेलर रिलिज

अभिनेता जॉन अब्राहम सध्या फारच निवडक सिनेमे करत आहे. आगामी काळात त्याचा 'सत्यमेव जयते' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 ऑगस्टला...

Akshay Kumar John Abraham And Bobby Deol Film Clash On Same Date
स्वातंत्र्यदिनी 'या' तीन सिनेमांची धडक!

सिनेसृष्टीतील तीन बड्या अभिनेत्यांचे सिनेमे नेमके एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. कोणताही बिग बजेट वा बिग बॅनर सिनेमा रिलीज झाला की तो 100 कोटींच्या...

blackmail movie
अभिनेत्री अनुजा साठे करणार आता "ब्लॅकमेल' 

हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे "बाजीराव मस्तानी'नंतर "ब्लॅकमेल' या हिंदी...