Sections

"बाहुबली'तील अथिरापल्ली धबधबा मराठी रुपेरी पडद्यावर 

तेजल गावडे |   बुधवार, 2 मे 2018
waterfall

केरळमधील सर्वात प्रसिद्ध धबधबा म्हणजे अथिरापल्ली. "बाहुबली: द बिगनिंग' चित्रपटातील "खोया है...' गाण्यातून याच धबधब्याने सर्वांना भुरळ पाडली. आता हा धबधबा आपल्याला मराठीच्या रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. "एकतीस दिवस' चित्रपटातील "मन का असे...' हे गाणे या धबधब्यावर चित्रित झाले आहे.

मुंबई : केरळमधील सर्वात प्रसिद्ध धबधबा म्हणजे अथिरापल्ली. "बाहुबली: द बिगनिंग' चित्रपटातील "खोया है...' गाण्यातून याच धबधब्याने सर्वांना भुरळ पाडली. आता हा धबधबा आपल्याला मराठीच्या रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. "एकतीस दिवस' चित्रपटातील "मन का असे...' हे गाणे या धबधब्यावर चित्रित झाले आहे. अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मयूरी देशमुख यांच्यावर चित्रित झालेले गाणे सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरेल. 

watefall

फिल्मफिनिटी प्रॉडक्‍शनचे बी. एस. बाबू निर्मित व आशीष भेलकर दिग्दर्शित "एकतीस दिवस' चित्रपटाची कथा जिद्दीने अडचणीवर मात करणाऱ्या एका सामान्य तरुणाभोवती फिरते. हिंदी चित्रपटसृष्टीत सहदिग्दर्शक असलेले आशीष भेलकर "एकतीस दिवस'च्या दिग्दर्शनातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून मातृभाषेने व मराठी संस्कृतीने भुरळ पाडल्याचे ते सांगतात. ते म्हणाले की, "मन का असे...' गाण्याला चिनार-महेश यांनी संगीत दिले आहे. गाणे अप्रतिम झाले असून त्याला एक वेगळी ट्रिटमेंट देण्याची गरज असल्याचे आम्हाला वाटले. त्यामुळे गाण्याचे चित्रीकरण एका स्पेशल ठिकाणी करायचे ठरविले. अथिरापल्ली धबधबा आणि ऍलेपी बॅकवॉटर डोळ्यासमोर आले. आमचे निर्माते बी. एस. बाबू कोचीतील असल्यामुळे सगळे काही छान जुळून आले. गाणे खूप छान बनले असून प्रेक्षकांनाही ते आवडेल अशी आशा आहे. 

"एकतीस दिवस'चे चित्रीकरण केरळ व मुंबईत झाले असून त्यात शशांक केतकर आणि मयूरी देशमुख अशी जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. त्याव्यतिरिक्त रीना अगरवाल, आशा शेलार, विवेक लागू, सुहिता थत्ते, नितीन जाधव व अरूण भेडसावळे आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 6 जुलैला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: athirapalli waterfall of bahubali now in marathi movie ektis divas

टॅग्स

संबंधित बातम्या

Sadanand-More
नवीन साहित्य प्रकाशित करण्यावर भर

पुणे - राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची...

संमेलनाने उजेड दाखवला - ढेरे

साहित्य संमेलन होणार की नाही, याचे सावट दूर होऊन हे संमेलन आनंदाने, यशस्वी झाले. रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाचेच हे फळ आहे. मळभ दाटून आलेले असताना...

उत्फुल्ल कारंजे (श्रद्धांजली)

जाड फ्रेमचा चष्मा, चेहऱ्यावर काहीसे बावळट भाव आणि डोळ्यात बेरकीपणा... अशा अवतारात किशोर प्रधान अवतरले की रंगभूमी किंवा चित्रपटांच्या पडद्याची चौकट...

जीत-मंत्र ! (ढिंग टांग!)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण...

गुंडप्रवृत्तीमुळेच 'निमंत्रण वापसी'

यवतमाळ- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ), ता.13 : गुंडप्रवृत्तीमुळेच 'निमंत्रण वापसी'चा निर्णय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना घ्यावा...

Sachin-Tendulkar
प्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा - सचिन तेंडुलकर

नागपूर - आपल्या देशात खेळावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. त्या तुलनेत मैदानावर खेळणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. भारत हा खऱ्या अर्थाने खेळाडूंचा...