Sections

सई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले महाराष्ट्र दिनी श्रमदान

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 2 मे 2018
Actress Sai Tamhankar Contributes for Shramadan At Maharashtra Din

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.

पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.

यंदा सुकळवाडीत गेलेल्या सईला श्रमदान केल्यानंतरच्या अनुभवाविषयी विचारल्यावर ती म्हणते, “दरवेळी श्रमदानात स्वेच्छेने सहभागी होणा-या कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय. आणि महाराष्ट्राच्या मातीची नव्या पिढीला ओढ लागतेय, हे पाहून मला खूप छान वाटतंय. इथे कुटूंबच्या कुटूंब येऊन श्रमदान करताना मी पाहते आहे. त्यातल्या एका शहरी कुटूंबप्रमुखाने श्रमदानावेळी मला सांगितलं, की, मी शेतक-याचा मुलगा असल्याने श्रमदानाचं महत्व मला आहे. पण माझ्या मुलीला पाणी कुठून येतं विचाराल तर ती सांगेल की नळातून. हे ऐकायला तात्पूरतं मजेशीर वाटलं तरीही हे भयाण सत्य आहे. त्यामूळेच आपल्या मातीची ओढ लागावी. म्हणून मी तिला श्रमदानासाठी घेऊन आलोय”

sai tamhankar

सई पुढे म्हणते, “ही प्रतिक्रियाच सांगते, की आजचे पालक आपल्या मुलांना पुन्हा एकदा मातीची ओढ लावू पाहता आहेत. आणि हे जर श्रमदानाने शक्य होत असेल, तर पाणी फाऊंडेशन नक्कीच यशस्वी ठरतेय असं मला वाटतं.”

ती पूढे सांगते, “1 मेच्या दिवशीच लग्न असलेलं एक जोडपं श्रमदानाला आलं होतं. त्याचप्रमाणे मी यावेळी अगदी सात वर्षांच्या लहानग्यांना आणि सत्तरी पार केलेल्या आजी-आजोबांनाही धडाडीने कुदळ फावडे हातात घेऊन काम करताना पाहिलं आणि श्रमदान करण्याचा हुरूप अजूनच वाढला. एक आगळं समाधान घेऊन मी त्या गावातून परत आली आहे.”

sai tamhankar

sai tamhankar

sai tamhankar

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Actress Sai Tamhankar Contributes for Shramadan At Maharashtra Din

टॅग्स

संबंधित बातम्या

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...

''जळगाव-सोलापूर लोहमार्ग व्हावा''

बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...

Sharad Pawars Solve Wrestling between two Marathi channels
शरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'

पुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...

solapur
सोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन 

सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...

पशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल

सांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ...