Sections

यंदा देशात "बंपर' साखर उत्पादन 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 3 एप्रिल 2018
sugar

माळीनगर - महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांत यंदा साखरेचे उदंड उत्पादन झाले आहे, त्यामुळे चालू हंगामात देशातील साखर उत्पादन 300 लाख टनांपर्यंत पोचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. "बंपर' साखर उत्पादनामुळे साखर उद्योग व सरकारी पातळीवर आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

माळीनगर - महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांत यंदा साखरेचे उदंड उत्पादन झाले आहे, त्यामुळे चालू हंगामात देशातील साखर उत्पादन 300 लाख टनांपर्यंत पोचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. "बंपर' साखर उत्पादनामुळे साखर उद्योग व सरकारी पातळीवर आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्रात यंदा अगोदरच 100 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात 93 लाख टन उत्पादन झाले आहे. देशात अलीकडच्या काळात 2014-15 च्या हंगामात विक्रमी 284.6 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जानेवारीत जारी केलेल्या सुधारित दुसऱ्या अंदाजानुसार, देशात 2017-18 च्या हंगामात 261 लाख टन साखर उत्पादन होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर "इस्मा'ने मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यानुसार, देशात यंदा 295 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज मांडला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशात 105.13 लाख टन, महाराष्ट्रात 106.3 लाख टन, तर कर्नाटकात 35.45 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. अन्य राज्यांत उर्वरित साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. 

उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी 27 मार्चअखेर 864 लाख टन उसाचे गाळप करून 10.72 टक्के साखर उताऱ्याने 92.68 लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतीत वाढ होण्यासाठी अधिकाधिक साखर निर्यात होण्याची साखर उद्योगाला अपेक्षा आहे. 

27 मार्चपर्यंतची स्थिती  - महाराष्ट्रात 99.43 लाख टन साखर उत्पादन  - 187 कारखान्यांपैकी 45 कारखाने बंद  - बहुतांश कारखान्यांचा गाळप हंगाम 15 एप्रिलपर्यंत आटोक्‍यात येणार  - 40 कारखान्यांचे गाळप मेपर्यंत चालू राहण्याचा अंदाज  - हंगामाअखेर राज्यात 106 लाख टन साखर उत्पादनाची शक्‍यता 

Web Title: sugar production in the two states of Maharashtra and Uttar Pradesh

टॅग्स

संबंधित बातम्या

रावेत बंधाऱ्याबाबत दिरंगाई

पिंपरी - रावेत बंधाऱ्याची दुरुस्ती करून उंची वाढविण्यासाठी अथवा नवीन बंधारा बांधण्यासाठी आवश्‍यक असलेले सर्वेक्षण करण्यात महापालिकेच्या...

तांब्यावरील जीएसटी कमी करा 

पुणे - तांब्यापासून तयार केलेल्या वस्तूंवर १२ टक्के वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आकारला जात असताना तांबे धातूवर मात्र १८ टक्के कर आकारला जात आहे....

एसटीमध्ये उमेदवार भरती प्रक्रिया सुरू

पुणे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागामध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित पदासाठीची...

Life imprisonment for murder in land and house disputes case in Solapur
सोलापूर : जमीन व घराच्या वादातून खून केल्याप्रकरणात जन्मठेप 

सोलापूर : जमीन व घरच्या वादावरून खून केला प्रकरणात परमेश्वर मल्लेशी ख्याडगी ऊर्फ परमेश्वर गुरुलिंगप्पा लच्याण (वय 68, रा. नावंदगी ता. अक्कलकोट) यास...

Local Crime Branchs All Out Operation In Parbhani
परभणीत स्थानिक गुन्हे शाखेचे 'ऑल आऊट ऑपरेशन'

परभणी : विविध गुन्हे असलेल्या परभणीतील एका हद्दपार एका कुख्यात आरोपीजवळ गावठी पिस्टलसह जिवंत काडतूसे व धारदार शस्त्र सापडली आहेत. स्थानिक गुन्हे...