Sections

राळेगणसिद्धीत साखळी उपोषण

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 24 मार्च 2018
राळेगणसिद्धी (ता. पारनेर) - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री काढलेला कॅंडल मार्च.

राळेगणसिद्धी (जि. नगर) - शेतमालाला दर मिळण्यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या, लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत गुरुवारपासून उपोषण सुरू केले. त्यामुळे हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

राळेगणसिद्धी (जि. नगर) - शेतमालाला दर मिळण्यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या, लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत गुरुवारपासून उपोषण सुरू केले. त्यामुळे हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

केंद्र सरकारने दडपशाही करून आंदोलनस्थळी जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या रेल्वे गाड्या, वाहने अडविली. सरकारच्या या कृतीचा निषेध करत गावकऱ्यांनी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत संताप व्यक्त केला. या साखळी उपोषणामध्ये सरपंच रोहिणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी यांच्यासह गावकऱ्यांनी सहभाग घेतला. साखळी उपोषणात गावकरी, महिला व शाळकरी मुलांनी सहभाग घेतला. आंदोलनाला पाठिंबा देत अन्य गावांचे लोकही सहभागी होत आहेत.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार आंदोलनस्थळी जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या रेल्वे, वाहने अडवल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 25) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी यांनी सांगितले.

Web Title: ralegansiddhi news anna hazare fasting

टॅग्स

संबंधित बातम्या

The clerk in Tahsildars office of Khandala was arrested for taking a bribe
खंडाळा : तहसीलदार कार्यालयातील लिपीकाला लाच घेताना अटक

खंडाळा : जमिनीवरील 32 ग ची नोंद रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना येथील तहसीलदार कार्यालयातील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक...

file photo
राजधानीत रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे....

दिघंचीतील दरोड्याची टिप थेट जिल्हा पोलिसप्रमुखांना 

दिघंची - दरोडा पडणार अशी टिप थेट पोलिस प्रमुखांनाच मिळाली. त्यानंतर सूत्रे हलली आणि आटपाडी पोलिसांची वाड्या वस्त्यांवर रात्रभर गस्त सुरु झाली. दिघंची...

लाखोंच्या उत्साहात कडेगावमध्ये गगनचुंबी ताबुतांच्या भेटी 

कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा आनंदसोहळा आज राज्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखांवर भाविकांनी अनुभवला. दुला दुला व...

विद्युतपंप जळाल्यामुळे शेटफळे प्रादेशिक पाणी योजना पडली बंद

आटपाडी - विद्युत पंप जळाल्यामुळे शेटफळे प्रादेशिक पाणी योजना गेले आठवडा बंद आहे. यामुळे पाच गावचा पाणीपुरवठा बंद झाला असून, पाण्यासाठी लोकांची एकच...