Sections

सरकार भिडेंना पाठीशी घालतंय: राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क |   सोमवार, 26 मार्च 2018
Radha Krishna Vikhe Patil

कोरेगाव भीमा प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मांडला. त्यावेळी ते बोलत होते. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले.

मुंबई : कोरेगांव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे एफआयआरमध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे याला अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून पत्रकार परिषदा घेवून वावरतो. मात्र राज्य सरकारला तो सापडत नाही. यावरून राज्य सरकार भिडे यास पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला.

कोरेगाव भीमा प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मांडला. त्यावेळी ते बोलत होते. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले.

यावेळी विखे-पाटील म्हणाले की, भिडेच्या कार्यक्रमांना सरकार परवानगी देते. मात्र याच भिडेला अटक करायची वेळ आली की पोलिसांना तो सापडत नाही. भिडे यांना अटक करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला असून या मोर्चाची दखल राज्य सरकार घेणार की नाही असा सवाल करत त्यांच्या मोर्चावर राज्य सरकारने बंदी का घातली? असा सवालही त्यांनी केला.

विखे-पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबतचा मुद्दा उपस्थित करत एकबोटे, भिडे हे खुले आमपणे पत्रकार परिषदा घेतात. तसेच त्या पत्रकार परिषदांमधून ते सरकारला धमकावतात. त्यांना भेटायला जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी जातात. यावरून सरकार त्यांना वाचवत असल्याचे दिसून येत असून त्यांना अटक कधी करणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.

तर रत्नागिरी येथील खेड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बाब राष्ट्रवादीचे बाळासाहेब कदम यांनी उपस्थित केला. तसेच या घटनेची नोंद राज्य सरकारने घेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी तशी सूचना राज्य सरकारला द्यावी अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली.

त्यावर तालिका अध्यक्ष सुभाष साबणे यांनी सरकारने याची नोंद घ्यावी अशी सूचना सरकारला केली. त्यावर गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सदर दोन्ही घटनांची दखल घेतल्याची त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनीही याबाबतचा मुद्दा उपस्थित करत शासन पळपुटे धोरण स्विकारत असल्याचा आरोप करत यावर चर्चेची मागणी केली. त्यानंतर सभागृहाचे पुढील कामकाज पुकारले असता भिडेला अटक कधी करणार असा सवाल वर्षा गायकवाड आणि जितेंद्र आव्हाड यांनी विचारून कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Radha Krishna Vikhe Patil criticize Sambhaji Bhide on Koregaon Bhima riot

टॅग्स

संबंधित बातम्या

‘विराट’ घेण्यास महाराष्ट्र इच्छुक 

मुंबई : भारतीय नौदलात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या विराट या युद्धनौकेचा ताबा घेण्यास महाराष्ट्र सरकार इच्छुक आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या...

The bench issued notice to the Principal Secretaries of Cooperative society
सहकारच्या प्रधान सचिवांना निष्काळजीपणा भोवला; खंडपीठाने काढली नोटीस 

औरंगाबाद : कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना विलंब व निष्काळजीपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्यात आली. सहकार...

उदय सामंत, शेखर निकमांच्या मैत्रीत मिठाचा खडा

चिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत हजर राहिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस...

 औषध दुकानदारांचा 28 सप्टेंबरला बंद

रत्नागिरी - औषधांच्या ऑनलाइन विक्रीला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शवला आहे. ऑनलाइन कंपन्या सर्रासपणे औषध...

गडहिंग्लज : देवदासींच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष बापू म्हेत्री. शेजारी दत्ता मगदूम, चंद्रकांत तेलवेकर, आप्पासाहेब नाईक, निलकंठ पट्टणशेट्टी आदी.
देवदासींचा 5 ऑक्‍टोबर रोजी गडहिंग्लज ते कोल्हापूरपर्यंत लॉंगमार्च

गडहिंग्लज - येथील देवदासी निराधार मुक्ती केंद्राच्या पुढाकाराने 5 ऑक्‍टोबर रोजी विविध मागण्यांसाठी देवदासी, वाघ्या-मुरळी, जोगते, शोषित,...