Sections

राज्यात नवीन उद्योजक तयार होणार - निलंगेकर

सकाळ न्यूज नेटवर्क |   गुरुवार, 26 एप्रिल 2018
Sambhaji-Patil-Nilangekar

मुंबई - स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

मुंबई - स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह-2018 चे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते म्हणाले, ""नवीन संकल्पनेवर व नवीन तंत्रज्ञावर उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने स्टार्टअप संकल्पना सुरू करण्यात आली आहे. स्टार्टअप अंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्टअप योजनेत समावेश आहे. या क्षेत्रातील नवीन उद्योजकांनी आपले अर्ज या सप्ताहात 25 ते31 मेपर्यंत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडे पाठवावयाचे आहेत. यामधील 100 व्यवस्थापन व उद्योजक यांची निवड करून त्यांना निवड समितीपुढे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून प्रत्येक्ष क्षेत्रातील तीन असे एकूण 24 नवीन उद्योजकांची निवड करून त्यांना 15 लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे.''

Web Title: new businessman sambhaji patil nilangekar

टॅग्स

संबंधित बातम्या

Startup
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २८ जानेवारीपासून

मुंबई - राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’चे आयोजन...

book review
उद्योगी माणसाची प्रेरक कथा (स्वाती यादवाडकर)

आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्यातरी टप्प्यावर प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रतिकूलता येत असते; पण आपल्या उत्तम अशा जीवनमूल्यांच्या आणि सर्जनशीलतेच्या...

prajakta kumbhar
कशाला उद्याची बात?

जमिनीवर पाय भक्कमपणे रोवतानाच आकाशात झेप घेण्याची स्वप्नं तरुणाईच्या डोळ्यांत फुलत असतात. ही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी बदलत्या भवतालाचं भान...

Startup-Company-Fund
स्टार्टअप कंपन्यांनी उभारला ३८.३ अब्ज डॉलरचा निधी

नवी दिल्ली - भारतातील विविध स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या वर्षभरात (२०१८) सुमारे ३८.३ अब्ज डॉलरचा निधी उभारल्याचे ‘योस्टार्टअप’ने आपल्या अहवालात म्हटले...

eco-cycle.jpg
जुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप 

पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...

बळी की बळीचा बकरा ? (मर्म)

भारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या "फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी...