Sections

रमेश कराड यांची उमेदवारी मागे; राष्ट्रवादीला जबर धक्का

सयाजी शेळके |   सोमवार, 7 मे 2018
Ramesh Karad

ज्या उमेदवाराला दोन दिवसांपूर्वी पक्षात घेतले, त्या राष्ट्रीय पक्षाला त्याची अधिकृत उमेदवारी मागे घ्यावी लागते, यापेक्षा दुसरी नामुष्की कुठली असू शकते.     
- सुरेश धस, उमेदवार, भाजप.

उस्मानाबाद : उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून रमेश कराड यांनी उमेदवारी मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली होती. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (ता. सात) दुपारी तीनपर्यंत होती. कराड दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर होते. कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सूचनापत्र दाखल केले. उमेदवारी मागे घेतल्याचे कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, थोड्याच दिवसात याबाबत माझी भूमिका स्पष्ट करेन, असे कराड यांनी सांगितले.  

कराड यांनी दोन मे रोजीच भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षप्रवेशाच्या वेळीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्याच दिवशी त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्री. कराड, भारतीय जनता पक्षाकडून सुरेश धस यांनी उमेदवारी दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याशिवाय अन्य चार जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी श्री. जगदाळे वगळता उर्वरित चौघांनी दुपारी दोनपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर अडीचच्या सुमारास श्री. कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात भाजपचे सुरेश धस आणि अपक्ष म्हणून श्री. जगदाळे हे आहेत.

ज्या उमेदवाराला दोन दिवसांपूर्वी पक्षात घेतले, त्या राष्ट्रीय पक्षाला त्याची अधिकृत उमेदवारी मागे घ्यावी लागते, यापेक्षा दुसरी नामुष्की कुठली असू शकते.     - सुरेश धस, उमेदवार, भाजप.

Web Title: NCP candidate Ramesh Karad withdraw nomination in legislative council election

टॅग्स

संबंधित बातम्या

कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा

बारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....

वैद्यकीय तपासणीनंतरच निवडणूक कामांतून मुक्तता 

मुंबई - निवडणुकांच्या कामातून सुटका मिळवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करतात; मात्र यापुढे त्यांना तसे...

बसच्या चाकाखाली चेंगरून आष्टीत वृद्धा मृत्युमुखी

आष्टी (जि. बीड) : बस आल्याचे धावत निघालेली वृद्धा चालकाला दिसून न आल्याने पुढील चाकाखाली आल्याने चेंगरून जागीच ठार झाली. शहरातील लिमटाका चौकात...

Baramatis total development is the main objective for NCP says Ajit Pawar
बारामतीचा सर्वांगिण विकास हेच उद्दिष्ठ : अजित पवार

बारामती शहर - समाजातील सर्वच घटकांना सोबत घेत बारामतीचा सर्वांगिण विकास साध्य करण्याचे उद्दीष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नजरेसमोर ठेवले असून या...

Shiv Sena youth leader Anupam Kulkarni left the Shiv Sena with supporters
शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांचा समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र

पाली (जि. रायगड) - येथील अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे संस्थापक आणि शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक सहकार्‍यांसोबत गुरुवारी (ता....