Sections

साम टीव्हीवर साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
saam tv

मराठी भाषा दिनानिमित्त खास कार्यक्रम

मुंबईः कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साम टीव्हीने यंदा साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. इन्फ्राटेक प्रस्तुत या साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण साम टीव्हीवरून मंगळवारी (ता. 27) दुपारी 12 वाजल्यापासून केले जाणार आहे. कविता, कथा आणि परिसंवाद यातून मराठी भाषेचे वैभव अधोरेखित केले जाणार आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त तीन वर्षांपासून साम टीव्ही हा उपक्रम राबवत आहे. यंदा त्याचे चौथे पर्व आहे.

ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ कथाकार अप्पा खोत, ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख, कवी नारायण पुरी, कवयित्री रमणी बबिता आकाश, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉ. वीणा सानेकर, वाचनालय चळवळीतील कार्यकर्ते राजीव जोशी आदी मान्यवर या साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत. साम टीव्हीचे वरिष्ठ निर्माता आणि कवी दुर्गेश सोनार यांनी या साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केले आहे.

Web Title: mumbai news saam tv marathi bhasha din sahitya sammelan

टॅग्स

संबंधित बातम्या

dr uma kulkarni
अनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध

साने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...

चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस मित्रांच्या हाती शिटी

गोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना...

manjari
मांजरी - रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपूल उभारणीचे काम बंद

मांजरी - येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर महिनाभरापूर्वी सुरू झालेले उड्डाणपूल उभारणीचे काम येथील काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने बंद पडले आहे....

Sakal medias fit program nutritious food allocation at solapur
'सोन्या गणपती'ने व्यक्त केली पोलिसांप्रती कृतज्ञता 

सोलापूर : नागरिकांच्या सुरक्षेसाठी ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिवाजी चौकातील सोन्या गणपती...

Distribute nutrition diet to children in Anganwadi of Fulambri
अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप; पिंपळगावच्या ग्रामपंचायतीचा उपक्रम 

फुलंब्री : पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आला. सरपंच कांताबाई अरुण...