Sections

भिडेंना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 23 मार्च 2018
Prakash-Ambedkar

मुंबई - कोरेगाव भीमामधील हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे; पण या प्रकरणातील दुसरे सूत्रधार संभाजी भिडे अजूनही बाहेर आहेत. हे पचनी पडत नाही. त्यांना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई - कोरेगाव भीमामधील हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे; पण या प्रकरणातील दुसरे सूत्रधार संभाजी भिडे अजूनही बाहेर आहेत. हे पचनी पडत नाही. त्यांना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तीला चौकशीला बोलावणे बंधनकारक असते; मात्र भिडे यांना चौकशीला बोलावले गेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भिडे यांना अटक झाल्यास वातावरणातील तणाव निवळेल. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणारा माझा मोर्चा अडवल्यास राज्यभर 144 कलम लागू करावे लागेल, असेही ते म्हणाले.

"ऍट्रॉसिटी'बाबतचा निर्णय दुर्दैवी ऍट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी असून, या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. या निर्णयामुळे संबंधितांना अभय देण्याचे काम न्यायालयाने केले आहे. असे निर्णय झाल्यास लोकांचा न्यायालयावरील विश्‍वास कमी होईल. हा मुद्दा "लार्जर बेंच'पुढे न्यायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: mumbai maharashtra news sambhaji bhide arrest government prakash ambedkar

टॅग्स

संबंधित बातम्या

Akhilesh Yadav Demands JPC Probe Into Rafale Deal, Says Issue Has Now Become Global
राफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल...

DJ
पुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा निर्णय

पुणे : उच्च न्यायालयाने "स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा आणि गणेशमूर्ती विसर्जन न...

devidas tuljapurkar
एकीचे बळ... मिळेल फळ? (देविदास तुळजापूरकर)

विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण...

मुंबईतील सराईत चोरट्याला ठाण्यात अटक ; 11 दुचाकी, मोबाईल हस्तगत

ठाणे : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक दुचाकी चोरणाऱ्या नासीर खान (रा. विक्रोळी-पार्कसाईट) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली....

मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा : गिरीश बापट 

पुणे : डीजे सिस्टीमसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर ठेवून विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी सहभागी व्हावे आणि गणेशोत्सवाची शांततेत सांगता...