Sections

राज्यात 46 लाखांची हरित सेना 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

सकाळ न्यूज नेटवर्क |   शुक्रवार, 30 मार्च 2018
Tree

मुंबई - राज्यात लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, हरित महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी राज्यभरात 46 लाख लोकांची हरित सेना सज्ज झाली आहे. 26 मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार राज्यात 46 लाख 8 हजार 795 लोकांनी तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

मुंबई - राज्यात लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, हरित महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी राज्यभरात 46 लाख लोकांची हरित सेना सज्ज झाली आहे. 26 मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार राज्यात 46 लाख 8 हजार 795 लोकांनी तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

यामध्ये सर्वाधिक नोंदणी लातूर जिल्ह्यात झाली असून, ती 4 लाख 66 हजार 167 इतकी आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात 3 लाख 99 हजार 660, तर बीड जिल्ह्यात 3 लाख 55 हजार 374 इतकी हरित सेनेची नोंदणी झाली आहे. चौथ्या स्थानावर नाशिक जिल्हा असून, तिथे 2 लाख 72 हजार 185 नोंदणी झाली आहे. पाचव्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे. तिथे 2 लाख 27 हजार 540 हरित सैनिकांची नोंद झाली आहे.

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढावा, त्याचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे म्हणून वन विभागाने महाराष्ट्र हरित सेना स्थापन करण्याचे निश्‍चित केले आणि राज्यभरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चळवळीत सहभागी होण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे. यासाठी http://www.greenarmy.mahaforest.gov.in या तसेचhttp://www.mahaforest.nic.in यासंकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Web Title: mumbai maharashtra news green army tree plantation

टॅग्स

संबंधित बातम्या

baramati
मोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ

बारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...

pathak
राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...

गेवराई - शहराजवळ दुचाकीला धडक दिल्यानंतर गॅरेजमध्ये घुसलेले ट्रॅक्‍टर.
वाळू तस्करीमुळे विद्यार्थिनीचा बळी

गेवराई - अवैध वाळू उपसा बंद असल्याची टिमकी महसूल विभाग वाजवित असले तरी विद्यार्थिनीचा बळी गेल्याने पुन्हा एकदा तालुक्‍यातील वाळू तस्करी चव्हाट्यावर...

औरंगाबाद - एमजीएममध्ये येमेनच्या अमल रागेह या युवतीशी संवाद साधताना डॉ. गिरीश गाडेकर, डॉ. गजानन काथार.
येमेनच्या युवतीचे खुबा प्रत्यारोपण यशस्वी

औरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे...

pal
पाल यात्रा नियोजन बैठक संपन्न

उंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....

mahabtd
महाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच

अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...