Sections

रणरणत्या उन्हात लाल ‘वादळ’ मुंबईकडे झेपावले

दीपक शेलार |   रविवार, 11 मार्च 2018
marathi news mumbai long march farmers lal vadal

ज्या गावांमध्ये डिजिटल युगात साधे नेटवर्कसुद्धा मिळत नाही अशा गावात, घरोघरी जाऊन लाल बावट्याच्या कॉम्रेड्सनी मोर्चेबांधणी केली आणि शेतकऱ्यांमध्ये चेतना जागवली. यथोचित प्रशिक्षण देऊन गावकर्याना त्यांच्या हक्कांसाठी झगडायला रस्त्यावर उतरवले. ​

ठाणे - वनजमिनी हक्क कायदा,कर्जमाफी,पेन्शन,स्वामिनाथन समितीच्या बाबींची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी आपापल्या गावाहून सरकारला जाब विचारायला रस्त्यावर उतरलेले लाल वादळ रविवारी रणरणत्या उन्हाची पर्वा न करता मुंबईकडे झेपावले. विशेष म्हणजे, ज्या गावांमध्ये डिजिटल युगात साधे नेटवर्कसुद्धा मिळत नाही अशा गावात, घरोघरी जाऊन लाल बावट्याच्या कॉम्रेड्सनी मोर्चेबांधणी केली आणि शेतकऱ्यांमध्ये चेतना जागवली. यथोचित प्रशिक्षण देऊन गावकर्याना त्यांच्या हक्कांसाठी झगडायला रस्त्यावर उतरवले. आज कोपरीच्या जकात नाक्यातून दुपारी प्रस्थान करीत सोमवारी मंत्रालयावर धडक देण्यासाठी हे लाल वादळ मुंबईच्या रस्त्यावर घोंघावू लागले आहे.त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत.

 शेकडो मैल पायपीट करीत आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेले शेतकरी अखेर शनिवारी रात्री मुंबईच्या वेशीवर धडकले.गेल्या एक आठवड्यापासून नाशिकहून निघालेले हे शेतकरी तब्बल 150 किमीचे अंतर आपल्या जिद्दीवर कापत मुंबईत पोचले.आपल्या विविध मागण्यांना सरकार दाद देत नाही या आक्रोशामुळे त्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडले आहे. नाशिकहून निघालेला हा मोर्चा व्हाया शहापूर मुंबईकडे पोहोचला.हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेले हे लाल वादळ आपले हक्क मिळवण्याच्या मागणीवर ठाम आहे. ठाण्यातील जकात यार्डमध्ये मोर्चेकऱ्यांनी व्यवस्था करण्यात आली होती. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय किसान सभेच्या झेंड्याखाली हे वादळ मुंबईत धडकले आहे. मोर्चामध्ये तब्बल 25 हजार शेतकरी सहभागी झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये शेतकरी सहभागी झाली असले तरी सकाळी उठल्यापासून ते पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्यापर्यंत कमालीची शिस्त पाहायला मिळाली. सकाळी आठ वाजता समुहाने न्याहरी करणारे महिला आणि पुरुष पुढच्या प्रवासाचे नियोजन करताना दिसले. मोर्च्याच्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची सूचना मिळाल्यास त्याची लगेच अंमलबजावणी करताना पहावयास मिळाली. आपल्या सहकाऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली कि नाही याचीही आवर्जून चौकशी केली जात होती.

आनंदनगर जकात नाक्याच्या यार्डमध्ये सर्व शेतकऱ्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे जातीने लक्ष देत होते. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थेपासून, त्यांना शिधा पोचवणे, मोबाईल टॉयलेट आणि अगदी अंघोळीलादेखील पाणी कमी पडू नये यासाठी पाण्याचे टँकर मागवण्यात आले होते. गावी नेहमी पाण्याच्या दुष्काळ पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी या टँकरखाली मनसोक्त अंघोळ केली. वैद्यकीय सेवा देखील या ठिकाणी उत्तमरीत्या करण्यात आली होती. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच रुग्णवाहिका या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. 

मोर्चेकरांना पाठींबा देण्यासाठी आलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी, शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही हीच भुमिका राहिली आहे. पालकमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणांमधून शेतकऱ्यांचे  मनोबल वाढवले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोर्चाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला असून सरकारदेखील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा लढा सुरु आहे. यापूर्वी अनेक आंदोलने झाली मात्र,कम्युनिस्टच्या झेंड्याखाली पहिल्यादांच अशाप्राकारे पायपिट करीत शेतकरी मुंबईत धडकल्याने यावेळी मागण्या मान्य होतील. तेव्हा परीक्षा काळ असल्याने सरकारने तातडीने भूमिका घ्यावी. अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

long march mumbai

थकलेल्या हजारो अनवाणी पायांची मुंबईत धडक "पदरी कोरडवाहू जमीनीचा तुकडा पदरी असल्याने आमच्या गावात नागल्या, भुईमूग अशीच पीक आम्हाला घेता येतात. पाणीच नाही तर,शेती कशी करायची ? पाऊस पडतो पण,पाणी धरून ठेवणारी जमीन नाही.त्यात पाचवीला पुजलेला दुष्काळ, नापिकी अशा अनेक समस्यांना तोंड देत गेली अनेक वर्ष आम्ही जगतो आहोत. आमच्या मुलाबाळांना तरी निदान त्यांचे हक्क मिळावेत या आशेने आम्ही इथवर झगडत आलो आहोत." अशी व्यथा मांडली. नाशिकच्या देहेलगाव येथील मीराबाई मुंडेकर आणि चंद्रभागा ठाकरे या महिलांनी चंद्रभागा तर शनिवारी मोर्चा सुरु असतानाच चक्कर आल्याने ठाण्यातील रस्त्यावर कोलमडून पडल्या होत्या.त्यांच्यावर सिव्हील रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने त्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.  

उत्साह वाढवणारे उद्घोषक आणि पारंपरिक संगीत शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यासाठी नाशिकहून हा मोर्चा पायी निघाला असला तरी, या मोर्च्याचा उत्साह वाढत आहे तो मोर्चाच्या प्रारंभी असलेल्या उद्घोषकांच्या दमदार घोषणाबाजीने आणि शेतकऱ्याच्या पारंपरिक वाद्य आणि नृत्यामुळे.अनवाणी चालत असलेले किसान सभेचे इद्रजित जीवा गावित आणि सुरगण्याचे वसंत बागुल व भिका राठोड ही त्रयी सतत मोर्चाला उत्तेजन देत सारथ्य करीत आहे. तर मोर्चेकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी सणासुदीला ज्याप्रकारचे नृत्य आणि वादन होत असते त्याप्रकारच्या साज संगीताची झलक या मोर्च्यामध्ये पाहायला मिळाली. संबळ, पावरी आणि भोपु या परंपरागत वाद्याची कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवण्यात येत आहे.मोर्चा चालू लागला कि ही वाद्य वाजायला सुरुवात होते आणि मग शेतकरी बांधव या वाद्यावर ताल धरत पुन्हा जोमाने चालू लागतात. 

ठाण्याच्या जकात नाक्यात भटारखाने मुंबईकडे झेपावत असलेल्या लाल वादळातील शेतकऱ्यांचा ताफा शनिवारी रात्री कोपरी जकात नाक्यात विसावला.ठाण्यात शिवसेना-मनसेकडून जरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी हजारो शेतकऱ्यांच्या पोटपूजेसाठी स्वत: शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या सरपणावरच यार्डमध्येच भटारखाने सुरु केले होते.शनिवारी रात्रीचे भोजन उरकल्यानंतर चांदण्याच्या साक्षीने निरभ्र आभाळाखाली सर्वजण पहुडले,कडाक्याच्या उन्हात डांबरी आणि सिमेंट,काँक्रीटच्या रस्त्यावरून पायपीट केल्याने अनेकांच्या पायांना फोड आल्याने कण्हतकण्हतच रात्र काढली ती पुन्हा दुसऱ्या दिवशी मुंबईकडे कूच करण्याच्या इराद्याने.रविवारी पहाटे टेंकरच्या नळाखाली न्हाणीधुणी उरकल्यानंतर मोर्चातील महिलावर्गानेही जमेल तशी वेणीफणी केली आणि बिनदुधाचा काळाकुट्ट चहाचा घोट आणि न्याहारीला प्लास्टिकच्या फाटक्या तुकड्यांवर वाढलेले फरसाण खाऊन दुपारी एकच्या  सुमारास पुन्हा हे वादळ मुंबईकडे झेपावण्यासाठी सज्ज झाले.

Web Title: marathi news mumbai long march farmers lal vadal

टॅग्स

संबंधित बातम्या

Police-Bribe
सलग दुसऱ्या दिवशी पोलिस लाचेच्या जाळ्यात

औरंगाबाद - सातारा पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात अडकल्यानंतर सिटी चौक ठाण्याच्या पोलिस नाईकाला अडीच हजारांची लाच घेताना पकडले. वाळू...

yeola
आम्हांला बी दुष्काळाच्या यादीत येऊ द्या कि रं..

येवला - यादीतून वगळलेला तालुका अखेर दुष्काळी यादीत समाविष्ट झाला मात्र साताळीसह १७ गावांचा समावेश न केल्याने या गावातून आता संतापाची भावना उमटू लागली...

Harsul-Jail
कैदी महिलांचे हात, बनवू लागले लॉक!

औरंगाबाद - हर्सूल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या पंधरा महिलांनी महिन्याकाठी तब्बल दोन लाख दुचाकी लॉक असेंब्ली तयार करण्याची किमया साधली आहे. अवघ्या ५००...

पालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी

येवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र...

Farmer-Suicide
मराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या 

औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार...

राहुरीमध्ये वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

राहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक...