Sections

मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
vinod-tawde

मुंबई - मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबाबत सरकार अभ्यास मंडळाला सूचना करील, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ज्ञानभाषा व्हावी, याकरिता सरकारने भाषेच्या विकासप्रक्रियेला अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करणारा ठराव आज विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला. त्या वेळी तावडे बोलत होते. राज्य कारभारात मराठीचा अधिक उपयोग करण्याबद्दल पावले उचलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

मुंबई - मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबाबत सरकार अभ्यास मंडळाला सूचना करील, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ज्ञानभाषा व्हावी, याकरिता सरकारने भाषेच्या विकासप्रक्रियेला अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करणारा ठराव आज विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला. त्या वेळी तावडे बोलत होते. राज्य कारभारात मराठीचा अधिक उपयोग करण्याबद्दल पावले उचलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

सुनील तटकरे यांनी मराठी भाषेच्या धोरणाबाबत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारवर ‘लोकराज्य’ हे मासिक गुजराती भाषेत प्रकाशित करण्याची वेळ येणे हा मराठीचा अपमान आहे. इंग्रजी शिक्षणाकडे ग्रामीण भागाचाही कल वाढत असल्याने मराठी भाषेला समृद्ध करण्याची जबाबदारी सरकारसह आपल्या सगळ्यांचीच आहे.’’

राज्याचे मुख्यमंत्री मराठीतून न बोलता इंग्रजी आणि हिंदीतून का बोलतात, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी या ठरावावर बोलताना उपस्थित केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी; तसेच बोलीभाषा वृद्धिंगत करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी केली; तर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मराठी भाषा बंद करू नये, अशी मागणी केली. भाजपचे भाई गिरकर यांनी आठवीपर्यंत असलेली मराठी विषयाची सक्ती बारावीपर्यंत करावी, अशी सूचना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी या ठरावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात मराठी भाषेच्या साहित्य संपदेचा आढावा घेतला. विधान भवनाच्या प्रांगणात ‘मराठी भाषा दिना’च्या कार्यक्रमात ध्वनिक्षेपक बंद पडले. हा प्रकार निंदनीय आहे. त्याची चौकशी करा, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

वाहनांवर मराठी नंबर प्लेट आवश्‍यक  वाहन क्रमांकाची पाटी इंग्रजीतच आवश्‍यक आहे का? मोटारीवर मराठीत क्रमांक असल्याने त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आल्याचा अनुभव असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितला. वाहनांवर मराठीतच क्रमांक असावा, अशी सूचना त्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना केली.

Web Title: marathi news marathi HSC maharashtra vidhan parishad

टॅग्स

संबंधित बातम्या

Petrol
पेट्रोल 100?

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दराने मुंबईत आज ९० रुपयांची पातळी ओलांडली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढत असल्याने देशभरात इंधनदर उच्चांकी...

गारगोटी येथे शाळकरी मुलीचा होरपळून मृत्यू

गारगोटी -सोनारवाडी (ता. भुदरगड) येथे शिवाजी पांडुरंग ऱ्हाटवळ यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. यात शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपूर्वा...

गोकुळ वार्षिक सभाः सभास्थळ २४ तास आधी पोलिसांनी ताब्यात घ्यावे

कोल्हापूर - ‘कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत रविवारी (ता. ३०) सभास्थळ चोवीस तास...

Born minutes after launch, baby girl in Jharkhand becomes first beneficiary of Ayushman Bharat scheme
झारखंडमधील चिमुकली "आयुषमान'ची पहिली लाभार्थी

जमशेदपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे (आयुष्मान भारत) उद्‌घाटन रविवारी (ता. 23) झारखंडमध्ये...

Abdulla Yameen concedes defeat in Maldives presidential election
मालदिवचे विद्यमान अध्यक्ष पराभूत

कोलंबो- मालदिवमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना पराभूत करत विरोधीपक्षांचे उमेदवार इब्राहिम महंमद...