Sections

‘जीएसटी’ करभरणात महाराष्ट्र अव्वल

प्रकाश बनकर |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
GST

तीस हजार कोटी एसजीएसटी; १६ हजार कोटी रुपये सीजीएसटी जमा
औरंगाबाद - देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्राने करभरणा करण्यात देशात अव्वल स्थान पटकावले आहे. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ३० हजार कोटी एसजीएसटी; तर १६ हजार कोटी सीजीएसटीचा भरणा राज्यात करण्यात आला, अशी माहिती केंद्रीय राज्य अर्थ मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे. 

तीस हजार कोटी एसजीएसटी; १६ हजार कोटी रुपये सीजीएसटी जमा औरंगाबाद - देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्राने करभरणा करण्यात देशात अव्वल स्थान पटकावले आहे. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ३० हजार कोटी एसजीएसटी; तर १६ हजार कोटी सीजीएसटीचा भरणा राज्यात करण्यात आला, अशी माहिती केंद्रीय राज्य अर्थ मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे. 

एक जुलैपासून एक देश - एक कर प्रणालीसाठी वस्तू व सेवाकर प्रणाली लागू करण्यात आली. राज्यात जीएसटीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे करदात्यांची संख्या वाढून कराचा भरणाही मोठ्या प्रमाणावर झाला. ३१ डिसेंबरपर्यंत देशात १ लाख कोटी करदात्यांनी जीएसटीसाठी नोंदणी केली असल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. 

गुजरातलाही टाकले मागे औद्योगिकीरणात पुढारलेल्या गुजरातलाही मागे टाकत महाराष्ट्रातून ३० हजार १८६ कोटी राज्य वस्तू व सेवा कर, तर १६ हजार ६३९ कोटी केंद्रीय वस्तू व सेवा कर वसूल झाला आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशने ११ हजार कोटी रुपये वसूल करीत दुसरे स्थान पटकावले. गुजरात सातव्या स्थानी गेला आहे. गुजरातमध्ये ६ हजार १३९ कोटी सीजीएसटी, १२ हजार ६७ कोटी रुपये एसजीएसटीचा भरणा झाला आहे.

Web Title: marathi news maharashtra news GST Tax Maharashtra Topper

टॅग्स

संबंधित बातम्या

लोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...

लॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज 

नागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...

Ganesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार

सध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात....

महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर 

मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...

Baramatis total development is the main objective for NCP says Ajit Pawar
बारामतीचा सर्वांगिण विकास हेच उद्दिष्ठ : अजित पवार

बारामती शहर - समाजातील सर्वच घटकांना सोबत घेत बारामतीचा सर्वांगिण विकास साध्य करण्याचे उद्दीष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नजरेसमोर ठेवले असून या...