Sections

राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद मराठीऐवजी गुजरातीत

सकाळ न्यूज नेटवर्क |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
Mumbai

तावडे बनले संकट मोचक
राज्यपालांचे भाषण सुरू असताना मराठी अनुवाद करन सांगणारे नेहमीचे प्रदीप भिडे नसल्याने मंत्री विनोद तावडे यांनी मराठी वाचन केले.

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाने झाली मात्र राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून न दिल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. तर, हे अभिभाषण गुजरातीत अनुवादीत झाल्याने विरोधकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार करीत विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यपालांचे भाषण मराठीत अनुवादित न होता ते गुजरातीत होत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.

तावडे बनले संकट मोचक राज्यपालांचे भाषण सुरू असताना मराठी अनुवाद करन सांगणारे नेहमीचे प्रदीप भिडे नसल्याने मंत्री विनोद तावडे यांनी मराठी वाचन केले.

Web Title: Marathi news Maharashtra news governor Vidyasagar Rao speech

टॅग्स

संबंधित बातम्या

rafale deal
सरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा

नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...

Ganesh festival : विसर्जन डीजेमुक्त! 

मुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...

Mahadevrao Mahadik
...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे? जर ते तयार नसतील तर मी...

शरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...

महाराष्ट्रातही "व्यापमं'चा धोका? 

नाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...