Sections

‘लाँग मार्च’ने सरकारला जाग!; मोर्चा आझाद मैदानात

सकाळ न्यूज नेटवर्क |   सोमवार, 12 मार्च 2018
Farmer Long-March

कर्जमाफीसाठी समिती नेमणार
शेतकरी आंदोलनातील नेत्यांचा पूर्वेतिहास पाहता त्यापैकी काहींनी अडून बसत वेगळी भूमिका घेतल्यास मनधरणी करून त्यांना विधान भवनात आणण्याची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था चोख राखत शेतकरी यशस्वीपणे हाताळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष राहणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण कर्जमाफीसाठी समिती नेमली जाईल. त्यानंतर अधिवेशन संपण्याआधी याबाबतची घोषणा सभागृहात केली जाईल, असे आश्‍वासन या शिष्टमंडळाला देण्यात येणार असल्याचे समजते.

मुंबई - शेतकरी मोर्चाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष राज्य सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच, संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकार सोमवारी मान्य करणार असल्याचे समजते. गेल्या वेळेप्रमाणेच आताही शेतकरी आंदोलनाच्या आव्हानाचा यशस्वी सामना करण्याची फडणवीस नीती सरकारने आखल्याचे संकेत आहेत. दरम्यान, परिक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हजारो शेतकऱ्यांनी मध्यरात्री पायपीट करत आझाद मैदान गाठले.  

महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल करत रविवारी मुंबईतील सायन येथे पोचलेला शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ सोमवारी आझाद मैदानावर धडकला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी विधान भवनात चर्चा करतील. त्या वेळी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याबाबतचे लेखी निवेदन सरकारकडून विधिमंडळात करण्यात येणार असल्याचे समजते. विधानसभा सदस्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर हे निवेदन सरकार सभागृहात करणार आहे.

दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी मोर्चाला सामोरे जाऊन मोर्चेकऱ्यांना सरकारशी चर्चेचे निमंत्रण दिले. अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीश बापट यांनीही विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे मोर्चाचे नेते अशोक ढवळे, अजित नवले यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांनी कन्नमवार येथे जाऊन मोर्चाल शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसेने या मोर्चास यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांना रविवारी रात्रीच आझाद मैदानाकडे जाण्याचे आवाहन पोलिसांनी केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यास दुजोरा मिळालेला नाही. 

बोंड अळीच्या भरपाईबाबत निर्णयाचीही चिन्हे नाशिक जिल्ह्यातील नारपार-पिरपांजाळ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देता यावे, यासाठी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे घालण्यात येणार आहे; तर बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबतही सोमवारी ठोस निर्णय होण्याची शक्‍यता आहे. वैयक्‍तिक लाभाच्या सामाजिक योजनांबाबतही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सकारात्मक निर्णय घेणार आहेत.  

वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रांवर जा ! शेतकरी मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वीत परीक्षा केद्रांवर पोचावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

Web Title: marathi news maharashtra news farmer long march government

टॅग्स

संबंधित बातम्या

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे दुष्काळी भागातील नागरीकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे...

आझाद मैदानावरील सकल मराठा समाजाचे उपोषण मागे

मुंबई- मुंबईतील आझाद मैदानावरील सकल मराठा समाजाने तब्बल 16 दिवसांनी आज (ता.17) उपोषण मागे घेण्यात आले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चानं राज्य सरकारमधील...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...

पाण्यासाठी सांगोल्यात जनावरांसह शेतकर्यांचे धरणे आंदोलन

सांगोला : तालुक्यातील माण नदीकाठच्या 14 गावातील शेतकऱ्यानी नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर जनावरासह मोर्चा...

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...

लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा...