Sections

गिरण्यांच्या जमीन वापराच्या धोरणाची चौकशी - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
devendra-fadnavis

कमला मिलपाठोपाठ मुंबईतील अन्य मिलच्या जमीन वापराच्या धोरणाची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नगरविकास विभागाचे माजी सचिव किंवा नगररचनाकार आणि वास्तुविशारदांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

कमला मिलपाठोपाठ मुंबईतील अन्य मिलच्या जमीन वापराच्या धोरणाची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नगरविकास विभागाचे माजी सचिव किंवा नगररचनाकार आणि वास्तुविशारदांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

मुंबईतील कमला मिल कंपाउंडला लागलेल्या आगीसंदर्भात अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘१९९९ मध्ये तयार केलेल्या धोरणानुसार बंद मिलच्या एकूण जागेपैकी ३० टक्के जागा ‘म्हाडा’ला, ३० टक्के मुंबई महापालिकेला आणि ३० टक्के गिरणीमालकांना देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते; मात्र त्यात २००१ मध्ये बदल करून नवीन धोरण करण्यात आले. त्यानंतर मिलच्या एकूण जमिनीऐवजी उपलब्ध मोकळ्या जागेपैकी एक तृतीयांश जमीन वापराबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही गिरण्यांमध्ये गिरणी कामगारांच्या घरासाठी एक इंच जमीनही म्हाडाला मिळाली नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती नेमून चौकशी करण्यात येईल.

जेथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी असलेल्या चटईक्षेत्राचा गैरवापर झाला असल्यास त्याची चौकशी केली जाईल. याबाबत धोरण तयार करून चटईक्षेत्राचा गैरवापर करणाऱ्या संबंधितांकडून पैसे वसूल केले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मुंबईतील प्रत्येक उपाहारगृहांचे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने ऑडिट केले जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Web Title: marathi news maharashtra CM Investigation of mills land

टॅग्स

संबंधित बातम्या

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

Waseem Rizvi
राम माझ्या स्वप्नात येतोः वक्फ बोर्डाचे अध्यक्ष

लखनौः भगवान श्रीराम हे माझ्या स्वप्नात आले होते. श्रीराम हे दुःखी असून, स्वप्नामध्ये त्यांना रडताना पाहिले आहे, असे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे...

मोबाईल, बँकेत 'आधार' अनिवार्य नाही : सर्वोच्च न्यायालय 

नवी दिल्ली : शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठी 'आधार कार्ड' असणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने...

Mumbai
नायर रुग्णालयतील बंद एमआरआय मशीन सुरु 

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील एमआरयआय मशीनला चिकटून राजेश मारु या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर बंद असलेली एमआरआय...

मुलांच्या मृत्युप्रकरणातील पित्याला जामीन मंजूर

औरंगाबाद - तीन मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला पिता राजू राठोड याला औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी सशर्त जामीन मंजूर केला....