Sections

व्हिडीओबाबत कॉंग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

सकाळ न्यूज नेटवर्क |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
congress

मुंबई - "टी सीरिज'तर्फे यू-ट्यूब व अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या व्यावसायिक व्हिडीओंमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नृत्य करताना आणि गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

मुंबई - "टी सीरिज'तर्फे यू-ट्यूब व अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या व्यावसायिक व्हिडीओंमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नृत्य करताना आणि गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

सावंत यांनी सांगितले की, या अगोदरही अशाच तऱ्हेचे काही व्हिडीओ टी सीरिज कंपनीतर्फे प्रसारित करण्यात आले होते; परंतु राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकारी व पोलिस नृत्य आणि गायन करताना प्रथमच दिसलेले आहेत. मुख्यमंत्री हे राज्यातील 12 कोटी जनतेला उत्तर देणारे व्यक्‍तिमत्त्व असल्याने कॉंग्रेस पक्ष या संदर्भात काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत असून, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. 

टी सीरिज कंपनीशी सरकारचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबिक नाते आहे? यामधील आदान-प्रदान काय आहे, सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र सरकार अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही; त्यामुळे सरकारचा या कंपनीशी करार झाला आहे का? असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा. जर सरकारशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली? त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली? मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का? कलाकारांचे मानधन कोणी दिले व या व्हिडीओचा खर्च कोणी केला, असे अनेक प्रश्‍न सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: marathi news congress music video Mharashtra CM

टॅग्स

संबंधित बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी केले 37 जणांना हद्दपार

मोहोळ : मोहोळ पोलिसांकडून गणेशोत्सव उत्सवाच्या मिरवणुकीत गांवात अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करून ...

Inspection by BDDS at ganesh mandals crowded places for safety
सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी बीडीडीएसकडून गणेश मंडळांची पाहणी 

नांदेड : शहरात देश- विदेशातून सचखंड गुरुद्वाराचे व रेणूका माताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या व शहराच्या सुरक्षेला काही...

A man arrested for ATM Fraud in Daund
दौंडमध्ये एटीएम अपहारप्रकरणी एकाला अटक

दौंड ( पुणे) : दौंड शहरात एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली ७ लाख ९३ हजार रूपयांची रोकड आणि संगणक साहित्य असा एकूण ९ लाख ९३ हजार रूपयांचा अपहार...

Parbhani Womens agitation on Friday for the government college
परभणी : शासकीय महाविद्यालयासाठी शुक्रवारी महिलांचे घेराव आंदोलन

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समस्त परभणीकरांच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाचा तीसरा टप्पा शुक्रवारी (ता. 21)...

bike
महाबळेश्वरजवळ अपघातात महिलेचा मृत्यू

सातारा : महाबळेश्वर ते मेढा रस्त्यावर केटीएम व पल्सर या दुचाकीची रेस सुरू असताना केटीएमची समोरून येणाऱ्या स्प्लेंडरला धडक बसून झालेल्या भीषण...