Sections

आता भाजपबरोबर युती नाही : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
uddhav

केंद्रात मजबूत सरकार आल्यास देशाचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. या सरकारने निवडणूक काळात दिलेले आश्वासन पाळले नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्‍यात गेली आहे. जसा पक्ष असतो, तसेच त्या पक्षाचे नेतृत्व असते. मोदी यांचा उदो उदो केला जातो, मात्र खासदार कसे वागतात, ते आपण पाहतच आहोत.

पारनेर - ""केंद्रामध्ये मजबूत व भक्कम सरकार यावे म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पाठिंबा दिला, ते केवळ "अच्छे दिन' येतील म्हणूनच. परंतु, त्यांनी केवळ फसव्या घोषणा करून खोटी स्वप्ने दाखवली. या सरकारला चार वर्षे झाले, तरी "अच्छे दिन' आले नाहीत. या सरकारने जनतेला फसविल्याने इथून पुढे भाजपशी युती करणार नाही व स्वतंत्रपणे निवडणूक लढून संपूर्ण महाराष्ट्र भगवा करणार,'' असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. पारनेर येथे आमदार विजय औटी यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "केंद्रात मजबूत सरकार आल्यास देशाचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. या सरकारने निवडणूक काळात दिलेले आश्वासन पाळले नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्‍यात गेली आहे. जसा पक्ष असतो, तसेच त्या पक्षाचे नेतृत्व असते. मोदी यांचा उदो उदो केला जातो, मात्र खासदार कसे वागतात, ते आपण पाहतच आहोत. शिवसैनिक सर्वसामान्य माणसाप्रमाणे सामान्यच राहतो व वागतो. आज अनेकांनी बॅंकांत गैरव्यवहार करून पैसे खाल्ले व परदेशात पळून गेले. दुसरीकडे शेतकऱ्यांची बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅंकेला टाळे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानला धडा शिकवू, अच्छे दिन, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ, यांसह अनेक फसव्या घोषणा या सरकारने केल्या. जो कोणी स्वप्न दाखवतो त्याचे भले होते; मात्र यापुढे अशा चमत्कारी बाबांचे खपवून घेतले जाणार नाही. आश्वासन काय दिले, याची विचारणा आम्हाला यापुढे लोकसभा निवडणुकीवेळी करावी लागेल. यांचे कार्यकर्ते व नेते शिवाजी महाराजांचे नाव फक्त निवडणुकीपुरते घेतात. प्रत्यक्षात महाराजांबद्दल व शिवजयंतीबद्दल यांचे वक्तव्य कसे असतात, याची जाणीव तुम्हाला झालीच आहे.''

ठाकरे म्हणाले, "आम्ही भगव्याचे पाईक आहोत. शिवाजी महाराज यांची आठवण आम्हाला निवडणुकीपुरती होत नाही, तर त्यांचे स्थान आमच्या हृदयात आहे. तुम्ही ज्या घोषणा देत आहात त्या घोषणांत मला महाराष्ट्र भगवा झाल्याचे दिसतो. महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री व आमचे सरकार दिसते.''

Web Title: marathi news bjp shinsena Uddhav Thackeray

टॅग्स

संबंधित बातम्या

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...

''जळगाव-सोलापूर लोहमार्ग व्हावा''

बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...

Sharad Pawars Solve Wrestling between two Marathi channels
शरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'

पुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...

उदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' ? 

सातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे...

गोवा : आमदार गावकरांचा वन महामंडळ अध्यक्षाचा राजीनामा

पणजी : राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेले सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आज गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला...