Sections

महिलांना ‘अस्मिता’ स्वाभिमानी बनवेल   

सकाळ न्यूज नेटवर्क |   शुक्रवार, 9 मार्च 2018
Asmita Yojana

मुंबई - महिला व किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी ‘अस्मिता’ ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमधील संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास व आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. 

मुंबई - महिला व किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी ‘अस्मिता’ ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमधील संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास व आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. 

ग्रामविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेचा प्रारंभ गुरुवारी मुंबई विद्यापीठातल्या दीक्षान्त सभागृहातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.  चित्रपट अभिनेते अक्षयकुमार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आदी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, अस्मिता योजना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रांतिकारी ठरावी, अशी ही योजना ग्रामविकास विभागाने सुरू केली आहे. अभिनेते अक्षयकुमार यांचा ‘पॅडमॅन’ चित्रपट ३१ मार्चपर्यंत सर्व शाळांमध्ये दाखवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. 

Web Title: marathi news Asmita Yojana women girl Sanitary pad maharashtra

टॅग्स

संबंधित बातम्या

"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक! 

नागपूर - "टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...

maratha kranti morcha
मराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)

राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...

कचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट

सातारा -  शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...

muktapeeth
घरचे कार्य! (ढिंग टांग)

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...

आरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त 

पुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...

शाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...