Sections

मंत्री झोपा काढतात काय? - अजित पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क |   गुरुवार, 1 मार्च 2018
ajit-pawar

मुंबई - सभागृहात पहिल्या रांगेतील बाकावर बसणाऱ्या 12 पैकी एकही मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत. मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत याची आम्हाला कल्पना आहे; परंतु बाकीचे मंत्री झोपा काढतात की काय? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. 

मुंबई - सभागृहात पहिल्या रांगेतील बाकावर बसणाऱ्या 12 पैकी एकही मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत. मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत याची आम्हाला कल्पना आहे; परंतु बाकीचे मंत्री झोपा काढतात की काय? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. 

विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरवात झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाषणावेळी सभागृहात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री उपस्थित नव्हते. विखे यांनी भाषणाला सुरवात करण्यापूर्वी पवार यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. 

विरोधी पक्षनेत्यांचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री हजर राहतात. मात्र, मुख्यमंत्री आज दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री नसले तरी मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री किंवा अर्थमंत्री, संसदीय कामकाजमंत्री, कृषिमंत्री यांपैकी एकही जण हजर नाही. मंत्री झोपा काढतात काय? असा प्रश्न पवार यांनी केला. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात सरकारचा दम निघालेला दिसतोय, असा टोलाही त्यांनी लगावला. 

पवारांचा संताप पाहून संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे सभागृहात आले. मंत्र्यांना उपस्थित राहण्याबाबत निरोप पाठवतो, तोपर्यंत विरोधी पक्षनेत्यांनी भाषण सुरू करावे, अशी विनंती तावडे यांनी केली. विखे भाषणाला उभे राहिल्यानंतर कॉंग्रेसच्या आमदारांनी मंत्री येईपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करावे, अशी विनंती केली. आमदारांनी गोंधळ घालायला सुरवात केल्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी 15 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. 

Web Title: marathi news ajit pawar minister vidhansabha

टॅग्स

संबंधित बातम्या

पवारांचा सल्ला "समजनेवालों'को इशारा! 

सातारा -  राष्ट्रवादीचे आमदार व खासदारांमधील संघर्ष टिपेला पोचल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बालेकिल्ला उद्‌ध्वस्त...

साडेतीन हजार पहिली उचल देणे अशक्‍य 

कऱ्हाड - यावर्षी ऊसदराच्या "एफआरपी'मध्ये भाजप सरकारने मोठी वाढ केली असून, उसाला यंदा पहिली उचल विनाकपात तीन हजार 575 रुपये देण्यासाठी राज्य सरकार...

प्राध्यापकांचा संप कायम 

मुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर...

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...

Sharad Pawars clarification on Udayanrajes Candidature
उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...