Sections

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव

सकाळ न्यूज नेटवर्क |   शुक्रवार, 23 मार्च 2018
Jalgav-University

मुंबई - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.

मुंबई - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.

जळगाव येथे 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. या विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर काही वर्षांनी याला खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती.

यासाठी अनेक आंदोलनेदेखील झाली. अलीकडेच पाडळसे येथे झालेल्या लेवा पाटीदार समाजाच्या महाअधिवेशनात या आशयाचा ठरावदेखील संमत करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेत खानदेशातील काही आमदारांनी यासंदर्भात मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली.

शिक्षण विभागाच्या चर्चेला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यास शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विद्यापीठाला नाव देण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली जात आहे. याला कुणाचा विरोध देखील नाही. मग याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी खानदेशातील अनेक सदस्यांनी याबाबत अनेकदा मागणी केली होती. खडसे यांच्याही सूचना आल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: maharashtra news north maharashtra university bahinabai chaudhary devendra fadnavis

टॅग्स

संबंधित बातम्या

जळगाव जिल्ह्यातून 12 हजार टन केळी निर्यात 

रावेर - जिल्ह्यातील निर्यात होणारे, शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणजे केळी आहे. या वर्षी जिल्ह्यातील सुमारे सहाशे कंटेनर...

Baramatis total development is the main objective for NCP says Ajit Pawar
बारामतीचा सर्वांगिण विकास हेच उद्दिष्ठ : अजित पवार

बारामती शहर - समाजातील सर्वच घटकांना सोबत घेत बारामतीचा सर्वांगिण विकास साध्य करण्याचे उद्दीष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नजरेसमोर ठेवले असून या...

Shiv Sena youth leader Anupam Kulkarni left the Shiv Sena with supporters
शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांचा समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र

पाली (जि. रायगड) - येथील अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे संस्थापक आणि शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक सहकार्‍यांसोबत गुरुवारी (ता....

amit shah
शहरी नक्षलवाद्यांचे राहुल समर्थन करताहेत: अमित शहा

रायपूर (छत्तीसगड): "पंतप्रधानांच्या हत्येचा कट करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी समर्थन करत आहेत. त्यांनी जनतेसमोर भूमिका...

Nilesh joshi- bhushan deshmukh
आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत भुषणला रौप्य पदक 

जळगाव ः उलानबतार (मंगोलिया) येथे झालेल्या एरोबिक जिम्नॅस्टिक्‍स आशियाई चषक स्पर्धेमध्ये भूषण देशमुखने ज्युनिअर- 2 म्हणजे 17 वर्षाखालील वयोगटात रौप्य...