Sections

मिशन मोडवर कर्ज द्या ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क |   रविवार, 6 मे 2018
Lend on mission mode Chief Ministers order

गेल्या वर्षी 47 टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले असून, 37 लाख 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले. यंदा 62 हजार 663 कोटींची पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्त्वाचा असून, खरिपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविण्याची आवश्‍यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्जपुरवठ्याचे जिल्हानिहाय नियोजन "मिशन मोड'मध्ये करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आज येथे पार पडली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले,की या हंगामात शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणुकीसाठी अर्थसाह्याची गरज भासते. त्यादृष्टीने पुढील दीड महिना आव्हानांचा आहे. शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्जपुरवठा मिशन मोडमध्ये करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

कृषी विद्यापीठांनी केलेले नियोजन प्रत्यक्षात येण्यासाठी यंत्रणेने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना तयार करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना कृषी विभागासोबत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या सूचना, केलेले नियोजन याबाबत जागरूक करावे. 

बियाणे व खतांचा पुरेसा साठा 

राज्यात खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कपाशीसह सर्व बियाण्यांची व सर्व खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. ज्या योजनेत शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला अशा योजनांच्या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, कांदाचाळ, शेडनेट, शेततळ्यांना अस्तरीकरण, कृषी प्रक्रिया या सर्व योजनांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. हवामान खात्यातर्फे चांगल्या पावसाचे भाकित व्यक्त करण्यात आल्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी 47 टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले असून, 37 लाख 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले. यंदा 62 हजार 663 कोटींची पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

यंदा पाऊसमान चांगले.. 

हवामान विभागानुसार एप्रिलच्या पूर्वानुमानानुसार सरासरी 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून केरळपर्यंत कधी पोचेल त्याचा पूर्वानुमान 15 मेपर्यंत देता येईल त्यानंतर मान्सूनचे महाराष्ट्रात कधी आगमन होईल याचा अंदाज वर्तविण्यात येईल.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण विभागात 93 ते 107 टक्के, मध्य महाराष्ट्रात 103 ते 100 टक्के, मराठवाड्यात 89 ते 111 टक्के, विदर्भात 92 ते 108 टक्के पाऊस होण्याची शक्‍यता आहे, असे हवामान खात्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.   

Web Title: Lend on mission mode Chief Ministers order

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

MES
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन

पुणे : पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही नामांकित संस्था 19 नोव्हेंबरला 159व्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचनिमित्ताने 24 नोव्हेंबर (शनिवार)...

झाडे जगवण्यासाठी रिकाम्या बॉटलची करा मदत; तरुणाईचे आवाहन

संग्रामपूर- सातपुडा पर्वतराईत सालईबन या आदिवासी परिसरात लागवड केलेल्या झाडांना जगविण्यासाठी रिकाम्या बिसलरी बॉटलची मदत करा, असे आवाहन तरुणाई...

पाण्यासाठी सांगोल्यात जनावरांसह शेतकर्यांचे धरणे आंदोलन

सांगोला : तालुक्यातील माण नदीकाठच्या 14 गावातील शेतकऱ्यानी नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर जनावरासह मोर्चा...

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...