Sections

इंदापूर विधानसभेच्या जागेवरून पेच  

राजकुमार थोरात |   सोमवार, 7 मे 2018

वालचंदनगर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरी चालेल, इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही, असे वक्तव्य केले असताना माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही कुठल्याही स्थितीत काँग्रेस जागा लढविणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक अद्याप दूर असली तरी या जागेवरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीत या जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

वालचंदनगर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरी चालेल, इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही, असे वक्तव्य केले असताना माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही कुठल्याही स्थितीत काँग्रेस जागा लढविणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक अद्याप दूर असली तरी या जागेवरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीत या जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी ३० एप्रिल रोजी अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या माध्यमातून भरणे यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने शक्तिप्रदर्शन केले. या वेळी अजित पवार यांनी इंदापूरच्या जागेवर हक्क सांगितला. भले आघाडी झाली नाही तरी चालेल, पण जागा सोडणार नाही असे सांगत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना आव्हान दिले. हर्षवर्धन पाटील यांनीही आघाडीचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार असल्याचे सांगून अजित पवारांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देऊ नका, असा संदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. तसेच इंदापूरची जागा लढविणार असे ठामपणे सांगितले. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. शरद पवार यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत. तसेच गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना इंदापुरातून मताधिक्‍य देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे या जागेबाबत शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण सन २००९ च्या निवडणुकीत भरणे बंडखोरी करून उभे राहिले असता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती.  

अजित पवारांकडून भरणेंना ताकद  हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच ते दत्तात्रेय भरणे यांना ताकद देत आहेत, अशी चर्चा तालुक्‍यात आहे. 

Web Title: Indapur Assembly constituency NCP & Congress politics

टॅग्स

संबंधित बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी केले 37 जणांना हद्दपार

मोहोळ : मोहोळ पोलिसांकडून गणेशोत्सव उत्सवाच्या मिरवणुकीत गांवात अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करून ...

Parbhani Womens agitation on Friday for the government college
परभणी : शासकीय महाविद्यालयासाठी शुक्रवारी महिलांचे घेराव आंदोलन

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समस्त परभणीकरांच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाचा तीसरा टप्पा शुक्रवारी (ता. 21)...

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

indapur
केंद्र सरकार साखर उद्योगाबाबत संवेदनशील नाही - हर्षवर्धन पाटील

इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भात अद्याप मंत्री समितीची बैठक घेतली नाही. केंद्र- शासन देखील या उद्योगासंदर्भात ...

Gali gali me shor hai Hindustan ka chowkidar chor hai Rahul Gandhi in Rajasthan
''गली गली में शोर है, चौकीदार चोर है''

नवी दिल्ली : ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला...