Sections

इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील लढणारच

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 4 मे 2018
harshvardhan-patil

इंदापूर - इंदापूर तालुका हा १९५२ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला असून, राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा निवडणूक शंभर टक्के लढविणार, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांनी दिली. 

इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणारच तसेच ही जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही तर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. ३०) अंथुर्णे येथील जाहीर सभेत केली. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेत यादव बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचा निर्णय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.’’

‘‘आघाडीसाठी होणाऱ्या दोन्ही पक्षांच्या राज्यातील सर्व बैठकांमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून हर्षवर्धन पाटील यांचा सहभाग असल्याने विधानसभेच्या जागेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. दिवंगत खासदार शंकरराव पाटील व आमदार राजेंद्रकुमार घोलप यांनी तालुक्‍यात विकास गंगा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविली आहे. त्यांचाच राजकीय वारसा हर्षवर्धन पाटील पुढे चालवत आहेत,’’ असे ॲड. यादव म्हणाले.  

‘जनता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी’ काँग्रेस व राष्ट्रवादीची २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात आघाडी असताना इंदापूरला राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार उभा करून आघाडीचा शब्द पाळला नाही. याउलट लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रामाणिकपणे प्रचार करून आघाडीचा धर्म पाळून त्यांना विजयी करण्यात मोठा वाटा उचलला आहे. याची जाणीव राष्ट्रवादीने ठेवली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत पाटील यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहील, असा विश्‍वास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांनी व्यक्त केला.

Web Title: Harshvardhan Patil from Indapur Assembly elections

टॅग्स

संबंधित बातम्या

आमदार सदानंद चव्हाण हॅट्ट्रिक करणार - उदय सामंत

चिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांचा जनसंपर्क आणि कामाचा आवाका जिल्ह्यातील पाचही आमदारांमध्ये सर्वाधिक असल्याने ते विजयाची हॅट्ट्रिक साधतील....

काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!
काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या...

sharad pawar
उदयनराजेंना वगळून पवारांच्या घरी आमदारांची बैठक

बारामती (पुणे) : सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे आज स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या...

nanded
नांदेड - बंदोबस्तावरील पोलिसांना टिफीनचे वाटप 

नांदेड - गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल आणि पोलिस मित्रांना जेवनाचे टिफीन वाटप करण्यात आले. हा...

पडळकर - देशमुख यांची बंद खोलीत चर्चा

आटपाडी - युवा नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांची दिघंची येथे बंद खोलीत चर्चा झाली. श्री. पडळकर यांनी...