Sections

संभाजी भिडेंविरोधात एकही पुरावा मिळाला नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा

ब्रह्मा चट्टे |   मंगळवार, 27 मार्च 2018
Devendra Fadnavis

मिलींद एकबोटे यांना पकडण्यासाठी पथक तयार होते. ते फरार होते. उच्च न्यायलयात पोलिस कोठडी मागून घेतली आहे. त्यासाठी अँटर्नी जनरल यांना विनंती केली. त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात राज्य सरकारची मागणी लावून धरली. व त्यानुसार मिलींद एकबोटे यांना पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एकबोटे यांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई : संभाजी भिडे यांच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केली. की त्यांनी भिडेंना त्याठिकाणी पाहिलं होतं. त्यानंतर आपण सगळे पुरावे तपासले. मात्र त्यानुसार संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही पुरावाही मिळाला नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्नावर विरोधकांच्या वतीने नियम 293 अन्वये दाखल स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यातील वाढलेल्या गुन्ह्यांमुळे विचलीत व्हायचं कारण नाही, मात्र चिंतीत जरूर व्हायला हवं. पण गुन्हेगारांना आपण शिक्षाही करत आहोत. कोरेगाव भीमाच्या घटनेसंदर्भात सदस्यांनी माहिती दिली. याठिकाणी 200 वर्षे पुर्ण झाल्यामुळे लोकांची गर्दी होणार असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्या ठिकाणी सरकारने पुरेपूर बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यापुर्वी वढू गावामध्ये एक घटना घडली. त्या गावात एक बोर्ड लावण्यात आला. त्यामुळे तो बोर्ड तोडण्यात आला. त्यामुळे दोन समाजात तणाव निर्माण झाला. त्यावरून एकमेकांविरोधात गुन्हे नोंद झाले. त्यानंतर वढू गावाने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत 31 डिसेंबरच्या रात्री पोलिस स्टेशनलाही कळवण्यात आले होते. मात्र, पोलिस 31 डिसेंबरच्या बंदोबस्तात होते. 1 जानेवारीला लोकं कोरेगाव भीमाला विजयस्तंभाला अभिवादन करायला येत होते. सगळं व्यवस्थीत सुरू होते. दरम्यान संभाजी महाराजांच्या समाधीजवळ हजार दीड हजार तरूणांनी मानवंदना दिला. त्यानंतर काही तरूण कोरेगाव भीमा येथील होते. त्यांनी रिंगण करून घोषणा दिल्या. त्यानंतर विरूध्दबाजूने पण घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही समाजाला बाजूला केले. पोलिसांचा बंदोबस्त पार्कींगच्या ठिकाणी कमी होता. त्याठिकाणी दगडफेक करून गाड्यांचे नुकसान करण्यात आले. तर दगडफेकीत एका तरूणांचे निधन झाले. तर नांदेड येथे एकाचे निधन झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "मिलींद एकबोटे यांना पकडण्यासाठी पथक तयार होते. ते फरार होते. उच्च न्यायलयात पोलिस कोठडी मागून घेतली आहे. त्यासाठी अँटर्नी जनरल यांना विनंती केली. त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात राज्य सरकारची मागणी लावून धरली. व त्यानुसार मिलींद एकबोटे यांना पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एकबोटे यांना ताब्यात घेतले आहे. संभाजी भिडे यांच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केली. की त्यांनी भिडेंना त्याठिकाणी पाहिलं होतं. त्यानंतर आपण सगळे पुरावे तपासले. मात्र त्यानुसार संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही पुरावाही मिळाला नाही. त्या तक्रारदार महिलेने इन कॅमेरा सांगितले आहे की, आपण भिडेंना पाहिले नाही. मात्र ही दंगल त्यांनी घडवल्याची चर्चा त्या ठिकाणी आपण ऐकली आहे. तरिही राज्य सरकारने तपास सुरूच ठेवला आहे. ही घटना गंभीर आहे. या घटनेला कोणीही जबाबदार असो त्याला सोडले जाणार नाही. यात माझ्या घरचे सामील असले तरी मी त्यांना सोडणार नाही. ही घटना महाराष्ट्राला कलंक आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. कोणालाही सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी ग्वाही सभागृहाला दिली.

Web Title: Devendra Fadnavis clean chit to Sambhaji Bhide in Koregaon Bhima riot case

टॅग्स

संबंधित बातम्या

सुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने!

सहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...

अखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू

मरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयात यापूर्वी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा येथे आत्महत्येचा प्रयत्न झाला. मंत्रालयाच्या दारातच एका...

मालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...

बारामतीत अल्पवयीन मुलासह पाच जणांवर मोकांतर्गत कारवाई

बारामती शहर : खून, खुनाचा प्रयत्न, दिवसा व रात्री घरफोडी, जबरी चोरी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलासह पाच...

बलात्कारातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी 

पिंपरी (पुणे) : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांची सक्तमजुरीची तर गुन्ह्यांमध्ये त्याला साथ देणाऱ्या...