Sections

प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र  -  बडोले

सकाळ न्यूज नेटवर्क |   सोमवार, 9 एप्रिल 2018
rajkumar-badole

बेलापूर - राज्य सरकारकडून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांच्याकडे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. हे प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना योजनांच्या लाभापासून दूर राहावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी राज्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी (ता. 8) सीवूड्‌स येथे दिली. 

अकराव्या जागतिक ऑटिझम दिनानिमित्त जनजागृती मोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सीवूड्‌स येथील ऑटिझम कनेक्‍टअंतर्गत न्यूरोजन ब्रेन ऍण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. बडोले म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग शब्द बदलून दिव्यांग शब्द आणला आहे. त्यामुळे त्यामागची भावनाही बदलली आहे. स्वमग्न नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारद्वारे विमा योजना राबवली जाते. या व्यक्तींचे पालकत्व स्वीकारण्यासाठीही कायदा आहे, असे त्यांनी सांगितले. 

न्यूरोजन ब्रेन ऍण्ड स्पाईन इन्स्टिट्यूटचे संचालक तथा न्यूरोसर्जरीचे प्रमुख डॉ. अलोक शर्मा यांनी चार वर्षांपासून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. 

Web Title: Certificate to every handicap person

टॅग्स

संबंधित बातम्या

imran khan
इम्रान यांची मुजोरी (अग्रलेख)

पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची...

#ChorPMChupHai Top Trend on Twitter
#ChorPMChupHai ट्रेंड ट्विटरवर टॉप टेनमध्ये

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे...

PM Inaugurates Airport In Pakyong Sikkim Airport
सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

गंगटोक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता.24) सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी, मोदींसोबत केंद्रीय मंत्री...

rahul gandhi
मोदी म्हणजे चोरांचे सरदार- राहुल गांधी

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी केली आहे. राहुल...

mohol
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ

मोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ...