Sections

भाजपच्या गुगलीने शिवसैनिक संभ्रमात

सकाळ न्यूज नेटवर्क |   बुधवार, 18 एप्रिल 2018
Shivsena-Bjp

मुंबई - सत्तास्थापनेनंतर सतत शिवसेनेसोबत सापत्नभावाने वागणाऱ्या भाजपने अकस्मात युतीची जाहीर भाषा सुरू केल्याने सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. भाजपचे हे युतीप्रेम केवळ "गुगली' असल्याची भावना शिवसेना नेते व शिवसैनिक व्यक्‍त करत असून, या वेळी भाजपच्या डावपेचाला बळी पडणार नसल्याचे संकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत.

मुंबई - सत्तास्थापनेनंतर सतत शिवसेनेसोबत सापत्नभावाने वागणाऱ्या भाजपने अकस्मात युतीची जाहीर भाषा सुरू केल्याने सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. भाजपचे हे युतीप्रेम केवळ "गुगली' असल्याची भावना शिवसेना नेते व शिवसैनिक व्यक्‍त करत असून, या वेळी भाजपच्या डावपेचाला बळी पडणार नसल्याचे संकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत.

प्रत्येक मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांना युतीबाबत कोणत्याही संभ्रमात राहू नका, असे निरोप पक्षनेत्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती व्हावी, अशी भाजप व शिवसेनेच्या खासदारांची प्रामाणिक भावना असल्याचे सांगण्यात येते. मात्र लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाली, तरच भाजपसोबत युती करण्याबाबत विचार व्हावा, असे काही शिवसेना नेत्यांचे मत आहे.

एकदा लोकसभेसाठी युती केली, तर नंतर भाजप विधानसभेसाठी युती करण्याची खात्री नसल्याचे अनेक शिवसेना नेत्यांना वाटते. भाजपच्या युतीबाबतच्या भूमिकेने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. राज्यात स्थानिक पातळीवर शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. हे दोन्ही मित्रपक्षांचे स्थानिक कार्यकर्ते परस्परांना नंबर एकचे शत्रू मानत असताना युतीचा निर्णय झाला, तर अनेक शिवसैनिक फारकत घेत बंड करतील, अथवा इतर पक्षांचा पर्याय निवडतील, असेही काही शिवसेना नेत्यांचे मत आहे. त्यामुळे शिवसैनिकांना संभ्रमात टाकून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या भूमिकेतूनच भाजपने युतीची गुगली टाकल्याची भावना एका शिवसेना नेत्याने व्यक्‍त केली.

मात्र उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत अजिबात चर्चा करण्याची तयारी नसल्याचे काही मोजक्‍या शिवसेना नेत्यांना कळवले असून, प्रत्येक मतदारसंघात स्वबळावरच तयारीला लागण्याचे निरोप दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP Shivsena shivsainik confuse politics

टॅग्स

संबंधित बातम्या

तेलगू देसमला गोव्यात स्वारस्य

मडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....

भाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख

नवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...

23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'

नवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...

vijay yadav
‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’

लखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...

'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील

मुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...

Dombivali
भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा 

डोंबिवली  : डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170...