Sections

पंकजा मुंडे यांचा आणखी एक 'भाऊ' राष्ट्रवादीच्या गळाला

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 2 मे 2018
Ramesh Karad

कोण आहेत रमेश कराड?
रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.

बीड : गेल्या अकरा वर्षांपासून मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. आज (बुधवार) दुपारी उस्मानाबाद येथे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपामध्ये कराड यांची घुसमट झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेची उमेदवारी देण्याच्या अटीवर प्रवेश केला जात असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज उस्मानाबाद येथे पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे  विधानपरिषद निवडणुकीपूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.

उस्मानाबाद-लातूर-बीडचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार दिलीपराव देशमुख यांचा कार्यकाळ संपत आहे. तीन टर्म दिलीपराव देशमुख यांनी ही जागा अबाधित ठेवली होती. मात्र नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी यावेळी जागा सोडली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी मोठी खेळी खेळत कराड यांना संधी दिली. रमेश कराड हे पंकजा मुंडेंचे मानलेले भाऊ आहेत.

कोण आहेत रमेश कराड? रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.

विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

Web Title: BJP leader Ramesh Karad enter NCP in Latur

टॅग्स

संबंधित बातम्या

ulhasnagar
उल्हासनगरात महापौरच्या निवडणुकीला धक्कादायक कलाटणी

उल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने...

Cabinet reshuffle in Goa in absence of Chief Minister parrikar
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना

पणजी- गोवा मंत्रिमंडळातून आज नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडूुरंग मडकईकर यांना डच्चू देण्यात आला. डिसोझा सध्या न्यूयॉर्क येथे उपचार...

उदय सामंत, शेखर निकमांच्या मैत्रीत मिठाचा खडा

चिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत हजर राहिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस...

sharad pawar
उदयनराजेंना वगळून पवारांच्या घरी आमदारांची बैठक

बारामती (पुणे) : सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे आज स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या...

ताडकळस - बालाजी रुद्रवार मारहाणी प्रकरणी येथील बाजारपेठ बंद

ताडकळस - शिवसेनेच्या पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी ता.23 सप्टेंबर रोजी परभणी येथे बोलावून ताडकळस ता.पुर्णाचे शहराध्यक्ष बालाजी रुद्रवार...