Sections

654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क |   मंगळवार, 24 एप्रिल 2018
Voting-Machine

मुंबई - राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

मुंबई - राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्हवाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या -ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदनगर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74, औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4 आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.

पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या) - ठाणे (90) - 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदनगर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43 आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.

Web Title: 654 grampanchyat election

टॅग्स

संबंधित बातम्या

जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल

अकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...

sarpanch.jpg
पाडळीच्या उपसरपंचपदी अरुण पापडे यांची बिनविरोध निवड

जुन्नर : पाडळी-बारव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण प्रल्हाद पापडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पुष्पा बुट्टे पाटील यांनी आपल्या पदाचा...

wada.jpg
वाड्यातील चोरघेपाडा येथील कुपनलिकेला येते गरम पाणी 

वाडा : वाडा तालुक्यातील चोरघे पाडा (बिलोशी) येथील काळुराम राघो चोरघे या शेतकऱ्याच्या कुपनलिकेला गेल्या दहा बारा दिवसांपासून गरम पाणी येत असल्याने हा...

download.jpg
सुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक

बोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...

karhad
हणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर

कऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...

kasbe nemade
नेमाडे संमेलनाध्यक्ष व्हावेत ही तर डॉ. कसबेंची इच्छा

लातूर : एकमेकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी 'ज्ञानपीठ'प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत यासाठी ज्येष्ठ विचारवंत-...