Sections

व्यक्त व्हायला लावणारा 'लॉस्ट अँड फाउंड'

सकाळ न्यूज नेटवर्क |   सोमवार, 1 ऑगस्ट 2016

येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित; जगण्यासाठी उमेद निर्माण करणारे कथानक

पुणे - आजकालच्या धकाधकीचे व डिजिटल जीवन जगत असताना माणसातील एकटेपणा वाढत आहे. अशाच एकटेपणावर भाष्य करणारा आणि आपल्या नावातच एक वेगळेपणा असणारा "लॉस्ट अँड फाउंड‘ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. 29 जुलै) सिनेमागृहात झळकणार आहे.
 

येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित; जगण्यासाठी उमेद निर्माण करणारे कथानक

पुणे - आजकालच्या धकाधकीचे व डिजिटल जीवन जगत असताना माणसातील एकटेपणा वाढत आहे. अशाच एकटेपणावर भाष्य करणारा आणि आपल्या नावातच एक वेगळेपणा असणारा "लॉस्ट अँड फाउंड‘ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. 29 जुलै) सिनेमागृहात झळकणार आहे.  

अग्निहोत्र या गाजलेल्या मराठी मालिकेनंतर स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, ‘स्पृहा आणि मी पहिल्यांदाच जोडी म्हणून या चित्रपटात काम करत आहोत, अशाच चांगल्या विषयाची वाट मी पाहत होतो. आजकालच्या "फास्ट लाइफ‘मुळे व्यक्त व्हायला लोकांना वेळ नाही आणि व्यक्त व्हावं असं जवळचं माणूसही नाही, अशी परिस्थिती दिसते. प्रत्येकाला व्यक्त व्हायला लावणारा हा चित्रपट आहे.‘‘

अभिनेत्री आणि सुंदर कविता करणारी कवयित्री, लेखिका म्हणून आपली ओळख असलेली स्पृहा जोशी हिने या चित्रपटातील दोन श्रवणीय गाणीही लिहिली आहेत. याविषयी स्पृहा म्हणते, ‘खूपच वेगळी आणि फ्रेश अशी या चित्रपटाची कथा आहे. नाउमेद झालेल्यांना ही कथा नव्याने आयुष्य जगण्याची प्रेरणा व पॉझिटिव्हिटी देते. याच भूमिकेतील भावनिक धाग्यामुळे मला या चित्रपटातील गाणी लिहिणं सोपं गेलं.‘‘

अशा हटके चित्रपटाचे दिग्दर्शन ऋतुराज धालगडे याने केले आहे. या विषयी तो म्हणतो, ‘आज माणसांच्या गर्दीतही अनेक माणसं एकटी आहेत. आपल्या भावना समजून घेईल, असं त्यांना कोणीच नाही. हाच या कथेचा मूळ गाभा असून, यातूनच सुरू होतो तो गमावण्याचा आणि गवसण्याचा प्रवास. प्रत्येक जण या चित्रपटाशी समरस होईल याची मला खात्री आहे.‘‘

गोल्डन गेट मोशन पिक्‍चर प्रस्तुत आणि विनोद मालगेवार निर्मित, या कथेला योग्य तो न्याय देण्यासाठी सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, मंगेश देसाई आणि डॉ. मोहन आगाशे या कलाकारांबरोबर अजूनही काही दिग्गज कलाकार आपल्याला या चित्रपटाच्या कथानकात भेटतील. विशेष म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशी आणि डॉ. राहुल देशपांडे यांनी या चित्रपटाची श्रवणीय गाणी लिहिली असून, शुभांकर यांनी लयबद्ध संगीत दिलं आहे. 

Web Title: Let it be expressed in 'Lost and Found'

टॅग्स

संबंधित बातम्या

सुप्रिया सुळे म्हणतात, 'इतना सन्नाटा क्यो है भाई'

बारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत...

वयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान

मुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या...

577525-mukta-tilak.jpg
सिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब

पुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...

shivsena
शिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिमेला फासले काळे

वाडा - एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी खासदार व स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यु व बाळासाहेबांच्या...

फलोदे (ता. आंबेगाव) येथील शहीद राजगुरू ग्रंथालय यांना रूग्णवाहिका येथील जनतेच्या सुविधांसाठी उपलब्ध करून देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
फलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध

घोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...

sahitya
रविवारपासून कल्याणमध्ये  44 वे महानगर साहित्य संमेलन 

कल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...