Sections

राष्ट्रकुल स्पर्धा हुकल्याची खंत - दीपा

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Deepa-Karmakar

सध्या तरी फक्त सरावाकडे लक्ष केंद्रित केले आहे. कुठल्याही स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार नाही. चाहत्यांचे प्रेम प्रचंड आहे आणि त्याच जोरावर मी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणार आहे. मला चौथ्या क्रमांकावर थांबायचे नाही.
- दीपा कर्माकर

नवी दिल्ली - भारताची अव्वल जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर हिने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेस मुकावे लागण्याची खंत व्यक्त केली आहे. मात्र, त्याच वेळी याचवर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धेत पदक मिळविण्याची जिद्द आपण बाळगली असल्याचेही तिने स्पष्ट केले. 

गुडघ्याच्या दुखापतीमुळे दीपा ४ ते १५ एप्रिल दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या दीपाने गुडघ्याची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. ती म्हणाली,‘‘दुखापत गंभीर नसून, त्यावरील उपचार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हलकासा सराव करण्यास सुरवातही केली आहे. दुखापती या खेळाडूच्या कारकिर्दीचा जणू एक भागच बनलेल्या असतात. त्यावर मात करून खेळाडूला पुढे जायचे असते.’’

आशियाई स्पर्धेत दीपा व्हॉल्ट, अनइव्हन बार, बॅलन्स बीम, फ्लोअर एक्‍सरसाइज अशा चारही प्रकारावर लक्ष केंद्रित करणार आहे. दीपा म्हणाली, ‘‘चारही प्रकारांवर लक्ष केंद्रित करणार असले तरी, माझा सर्वाधिक भर हा व्हॉल्ट प्रकारावर असेल. एका क्रीडा प्रकाराची आवड लागली की तोच आपलासा होऊन जातो. त्यातच वर्चस्व मिळविण्याचा अधिक प्रयत्न होतो; पण मी अन्य प्रकारही आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहे.’’

दोनच दिवसांपूर्वी भारताच्या अरुणा रेड्डी हिने जागतिक स्पर्धेत ‘व्हॉल्ट’ याच प्रकारात ब्राँझपदकाची ऐतिहासिक कामगिरी केली. दीपा म्हणाली, ‘‘तिच्या कामगिरीचा मला अभिमानच आहे. आम्ही एकत्रच सराव करतो. २०११ मध्ये ती राष्ट्रीय शिबिरात बिश्‍वेश्‍वर नंदी यांच्याकडे आली. त्यानंतर २०१४ ते २१०७ मध्ये आम्ही एकत्रच सराव करत होतो. तिने परदेशातही प्रशिक्षण घेतले आहे; पण ब्राँझपदक मिळविताना तिने मारलेल्या उडीचे तंत्र हे तिने नंदी सरांकडेच शिकले आहे.’’

Web Title: sports news commonwealth competition deepa karmakar

टॅग्स

संबंधित बातम्या

Rahul Gandhi
मोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी

नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...

rafale deal
सरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा

नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...

मंत्री रावलांकडून नौकानयनपटू मनीषा माळीला एक लाखाची मदत

न्याहळोद (जि. धुळे) : विश्‍वकरंडक नौका नयन ड्रॅगन बोट स्पर्धेत राज्याचे नाव गाजविणारी न्याहळोद (ता. जि. धुळे) येथील जिगरबाज नौकानयनपटू मनीषा...

ganpatrao andhalkar
तांबड्या मातीचे देणे 

आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा...

Narendra Modi
#HappyBdayPMModi ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली- देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज वाढदिवस वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात शाळेतील...