Sections

अनुप कुमार, मनजित पुन्हा भारतीय संघाबाहेर

वृत्तसंस्था |   रविवार, 25 मार्च 2018
Anup-Kumar-manjeet-chillar

मुंबई - आशियाई स्पर्धेनंतर  आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संभाव्य संघातूनही अनुप कुमार, मनजित चिल्लर यांना वगळण्यात आले. सराव शिबिरासाठी ४४ पुरुष आणि ४२ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

हे शिबिर काही दिवसांपूर्वीच हरियाणात सुरू झाले आहे. जसवीर, नवनीत, शब्बीर बापू यांचाही समावेश नाही. अहमदाबादला झालेल्या विश्‍वकरंडक  स्पर्धेनंतरच्या कामगिरीत अनुपचा फारसा प्रभाव पडला नव्हता. राष्ट्रीय तसेच फेडरेशन स्पर्धेतही तो यशस्वी झाला नव्हता, त्यामुळे त्याचे पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत. 

मुंबई - आशियाई स्पर्धेनंतर  आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संभाव्य संघातूनही अनुप कुमार, मनजित चिल्लर यांना वगळण्यात आले. सराव शिबिरासाठी ४४ पुरुष आणि ४२ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

हे शिबिर काही दिवसांपूर्वीच हरियाणात सुरू झाले आहे. जसवीर, नवनीत, शब्बीर बापू यांचाही समावेश नाही. अहमदाबादला झालेल्या विश्‍वकरंडक  स्पर्धेनंतरच्या कामगिरीत अनुपचा फारसा प्रभाव पडला नव्हता. राष्ट्रीय तसेच फेडरेशन स्पर्धेतही तो यशस्वी झाला नव्हता, त्यामुळे त्याचे पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत. 

संघातील निवडीसाठी खूपच चुरस आहे. त्यातच तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कोणाचे स्थान नक्की नसते. अनुप, राकेश यांच्यासारख्या खेळाडूंकडून आम्ही शिकलो आहोत. प्रत्येकाला संघाबाहेर जावे लागते. हे आमच्याबाबतीतही घडू शकते, असे आशियाई विजेत्या संघाचा कर्णधार अजय ठाकूरने आशियाई संघ निवडीच्या वेळी सांगितले होते.

महिलांच्या संभाव्य खेळाडूंबाबत बोलायचे झाले, तर तेजस्विनी आणि ममता पुजारी यांना पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. 

दीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राचे पाच खेळाडू सराव शिबिरासाठी निवडले आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत चांगली कामगिरी केलेल्या नितीन मदनेचीही निवड झाली असती, तर जास्त आनंद झाला असता. आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात महाराष्ट्राचे दोन ते तीन खेळाडू असावेत, ही अपेक्षा आहे. - डॉ. माणिक राठोड, महाराष्ट्राचे कबड्डी मार्गदर्शक

महाराष्ट्राचे आठ खेळाडू सराव शिबिरात संभाव्य संघात महाराष्ट्राच्या आठ खेळाडूंची निवड झाली. त्यात पाच पुरुष आणि तीन महिला आहेत. गिरीश इरनाक, नीलेश साळुंके, रिषांक देवाडिगा, सचिन शिंगाडे आणि विकास काळे या राष्ट्रीय विजेत्या संघातील खेळाडूंची निवड झाली आहे, तर अभिलाषा म्हात्रे, सायली जाधव आणि सायली केरीपाळे या संभाव्य संघात आहेत.

Web Title: sports news Anup Kumar, Manjit Chillar Asian Games Competition

टॅग्स

संबंधित बातम्या

#MeToo : नवाजुद्दीन सिद्दिकीवर माजी मिस इंडिया निहारिका सिंगचा आरोप 

मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी...

book review
आई नावाच्या "आधारवडा'विषयीची हृद्य मनोगतं (हेमंत जुवेकर)

आई हे सर्वनाम असलं, तरी खरं तर ते असतं घर तोलून आणि सावरून धरणाऱ्या प्रेमाचं विशेषनाम. अवघं विश्व सामावण्याची क्षमता असलेला शब्द. आईविषयी मनात खूप...

आव्हाने पेलण्यात मोदी सरकार अपयशी : पी. चिदंबरम 

मुंबई : आभाळाला भिडणारी महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षा व्यवस्था ही देशासमोरची सध्याची सर्वात मोठी आव्हाने आहेत. मोदी सरकार ही आव्हाने पेलण्यात अपयशी...

'आईच्या संस्काराची शिदोरी राजकारणातही कामी आली' 

मुंबई - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने केलेल्या संस्काराची शिदोरीच गेल्या 50 वर्षांतील राजकारणात उपयुक्‍त ठरली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...

पश्‍चिम उपनगरात पाणीबाणी 

मुंबई  - पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापासून मुंबईत पाणी संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम उपनगरांना बसणार आहे. पश्‍...

भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारची निवृत्ती

मेरठ- भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो यापुढे केवळ "ओएनजीसी'कडून खेळणार आहे. तो म्हणाला...