Sections

सराव करताना सिंधूला दुखापत

पीटीआय |   बुधवार, 28 मार्च 2018
sindhu

नवी दिल्ली - जागतिक आणि ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूचा घोटा सराव करताना दुखावला; मात्र दुखापत गंभीर नसल्यामुळे ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकेल, असे सांगितले जात आहे.

हैदराबादच्या पुल्लेला गोपीचंद अकादमीत सराव करताना सिंधूचा घोटा दुखावला. लगेचच एमआरआय तपासणी करण्यात आली. सिंधूने आज विश्रांती घेतली आहे. उद्याही (बुधवारी) विश्रांती घेतल्यावर गुरुवारपासून सिंधू पुन्हा सरावास सुरवात करेल, असे सिंधूचे वडील पी. व्ही. रमणा यांनी सांगितले. 

सिंधू उद्या केवळ स्ट्रेटनिंग करणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा सांघिक बॅडमिंटन स्पर्धा ५ एप्रिलपासून होईल. त्यामुळे तिच्या सहभागाबाबत चिंता बाळगण्याचे कारण नाही, असेही रमणा यांनी सांगितले. जागतिक क्रमवारीत तिसरी असलेल्या सिंधूकडून भारतास वैयक्तिक सुवर्णपदकाचीही आशा आहे. गतस्पर्धेत तिने ब्राँझ जिंकले होते.

Web Title: Sindhu hurt while practicing

टॅग्स

संबंधित बातम्या

Narendra Modi
#HappyBdayPMModi ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली- देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज वाढदिवस वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात शाळेतील...

इंधनाचं 'गणित' (भरत फाटक)

गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं...

loni
खेळालाही करिअर म्हणून निवडा : पोलिस अधिकारी विजय चौधरी

लोणी काळभोर : खेळात पैसा, प्रसिद्धी, नोकरी, नाव, सन्मान, पुरस्कार सर्व गोष्टी आहेत. मागिल काही वर्षापासून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना...

CHAUDHARI
'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजय चौधरींची पुणे ग्रामीणला नियुक्ती

पुणे : 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता तथा पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. 11 सप्टेंबरला त्यांनी पुणे...

live photo
दिव्यांग संकेतने रोवला लेहवर झेंडा 

सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून...