Sections

ट्रेकिंग,पॅराग्लायडिंगच्या साहसी प्रशिक्षणासाठी नाशिकला सेंटर 

अरूण मलाणी |   सोमवार, 16 एप्रिल 2018
residentional photo

नाशिक : ट्रेकिंग पॅराग्लायडिंग,गिर्यारोहण,,प्रस्तारोहण...यासारखं शब्द ऐकलं किंवा कानी पडले की लगेचच आपल्या डोळ्यासमोर घनदाट जंगल,उंचच उंच डोंगर,दऱ्या, वळण घेणाऱ्या नद्या,त्यातून वाट काढत पुढे जाणारे,डोंगरकड्यावर साहस दाखवत कौशल्यपणे चढणारे ट्रेकर्स,आकाशात झेपावणारे पॅराग्लायडिंग करणारे वीर उभे राहतात. तरूणाईचे तर सध्या ट्रेकिंग या साहसी क्रीडाप्रकाराकडे चांगलेच आकर्षण वाढले आहे. त्यातही तंत्रशुध्द माहीती प्रशिक्षण येत असेल तर मग विचारायलाच नको. अशाच उत्साही गिरीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

नाशिक : ट्रेकिंग पॅराग्लायडिंग,गिर्यारोहण,,प्रस्तारोहण...यासारखं शब्द ऐकलं किंवा कानी पडले की लगेचच आपल्या डोळ्यासमोर घनदाट जंगल,उंचच उंच डोंगर,दऱ्या, वळण घेणाऱ्या नद्या,त्यातून वाट काढत पुढे जाणारे,डोंगरकड्यावर साहस दाखवत कौशल्यपणे चढणारे ट्रेकर्स,आकाशात झेपावणारे पॅराग्लायडिंग करणारे वीर उभे राहतात. तरूणाईचे तर सध्या ट्रेकिंग या साहसी क्रीडाप्रकाराकडे चांगलेच आकर्षण वाढले आहे. त्यातही तंत्रशुध्द माहीती प्रशिक्षण येत असेल तर मग विचारायलाच नको. अशाच उत्साही गिरीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाने पुढाकार घेत अंजनेरीच्या पायथ्याशी ऍडव्हेंचर्स स्पोर्टस्‌ ट्रेनिंग सेंटर सुरु केले आहे.

राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्राचा मानही नाशिकला मिळाला आहे. यामुळे भविष्यात नाशिक हे ट्रेकर्स,गिरीप्रेमींसाठी फेमस्‌ डेस्टींनेशन म्हणून नावारूपास येईल. यात शंकाच नाही.  सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या नाशिकचं नेहमीच सर्वांना आकर्षण राहिलं आहे. धार्मिक,पौराणिक शहराबरोबरच अल्हादायक वातावरण हे इथलं वैशिष्ठ राहिलं आहे. त्यामुळेच अनेकजण हवापालट करण्यासाठी वर्षातून एकदोनदा तरी हमखास हजेरी लावतात.

काहींनी तर फक्त हवाबदलासाठी प्लॅट,प्लॉंट घेऊन ठेवले आहे. गेल्या काही वर्षापासून नाशिक औद्योगिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,आर्थिक आणि गुंतवणूक अशा सर्वच बाबतीत बदलत आहे. याला क्रीडाक्षेत्र सुध्दा अपवाद नाही. सध्या तरूणाईत गिर्यारोहण,पॅराग्लायडिंगसारख्या साहसी क्रीडाप्रकाराबद्दल आकर्षण वाढले आहे. सुट्टी मिळेल त्या दिवशी नजीकच्या ठिकाणी गिर्यारोहणासाठी युवक-युवती हजेरी लावताता. अगदी राज्यातील बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्याचे प्रमाणही मोठेच आहे. 

वाढत्या घटनांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना  साहसी क्षेत्राविषयी आकर्षण वाढण्यासोबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, सेल्फी घेण्याच्या मोहातून होणाऱ्या दुर्घटना हा एक चिंतेचा विषय बनला आहे. गड-किल्ले हिंडतांना निसर्गाच्या सानिध्यात राहून अस्सल आनंद अनुभवण्याची संधी मिळत असल्याने गिर्यारोहणाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळतो आहे. गिर्यारोहण करणाऱ्या संस्था, क्‍लबची संख्याही वाढत चालली आहे. सळसळत्या युवकांकडून गिर्यारोहणादरम्यान झालेल्या चुका जीवावर बेततील इतक्‍या गंभीर असतात.   

अद्यावत सेंटरची स्वतंत्र निर्मिती  लोकांमध्ये जनजागृती करण्यासह प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ऍडव्हेंचर्स स्पोर्टस्‌ ट्रेनिंग सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कॉन्फरन्स हॉल, जेवण्याच्या व्यवस्थेसाठी सभागृह, स्वयंपाकगृह यासह शंभर मुले वास्तव्य करू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे. या केंद्रावर पयाभूत सुविधा विकसीत केल्या असून लवकरच प्रशिक्षण वर्गांना सुरवात केली जाणार आहे. 

26 एप्रिलला प्रशिक्षण वर्ग  केंद्रावर येत्या 26 एप्रिलला सामान्य प्रशिक्षण वर्ग (बेसिक ट्रेनिंग कोर्स) आयोजित केला आहे. या उपक्रमात राज्यभरातील इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. यापुढील टप्यात प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी देहरादून येथील नेहरू मॉंटेनींग ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांना प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शर करणार आहेत. यशस्वी संयोजनानंतर शासन स्तरावर प्रशिक्षक, व्यवस्थापकांची नियुक्‍तीवरही विचार केला जाणार आहे. 

अशी असेल व्यवस्था  गिर्यारोहण, प्रस्थारोहणासह अन्य थरारक कसरतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात रॉक क्‍लायबिंग, रॅपलींगसह सायकल ट्रॅक विकसीत केले जाणार आहे. यामूळे युवकांना तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या विविध सुविधा आगामी काळात विकसीत केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील इच्छुकांना केंद्रावर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. 

कोट:(39692)  गिर्यारोहणावेळी छोट्या चुकांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमुळे जीव मगवावा लागल्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. धोकादायक ठिकाणांवर सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावर बेततो. यासंदर्भात जनजागृती करण्यासह शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी ऍडव्हेंचरस स्पोर्टस्‌ ट्रेनिंग सेंटर उपयोगी ठरणार आहे. सर्व पायाभुत सुविधा या सेंटरवर उपलब्ध असतील.  -रवींद्र नाईक,  जिल्हा क्रीडा अधिकारी.   

Web Title: marathi _news_tracking and paraglayding

टॅग्स

संबंधित बातम्या

Asia Cup 2018 : शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत

दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन...

बारामती शहरात पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक

बारामती शहर : आदर्श गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची प्रथा यंदाही कायम ठेवत बारामतीतील बहुसंख्य मंडळे व कुटुंबानीही पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती दिली....

Dhule
धुळ्यात लोकसहभातून बसविले 32 सीसीटीव्ही कॅमेरे 

धुळे : विधायक कार्यासाठी साडेतीनशे तरुण संघटित झाले आणि त्यांनी वंदे मातरम प्रतिष्ठानची धुळे शहरात स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव...

nine accused arrested in six murders in Palam parbhani
पालममधील सहा गुन्हयाची उकल; 9 आरोपींना अटक

परभणी : पालम पोलिस ठाण्यातंर्गत दाखल असलेल्या सहा गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यात सहा मोटार सायकल व इतर साहित्य...

आवाज कमी कर डीजे तुला...! 

गणेशोत्सव म्हणजे मांगल्य, चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक. समाजप्रबोधन हाच मूळ गाभा असणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहिले...