Sections

हरियाना खेळाडूंना हवा बक्षिसाचा दुहेरी मलिदा

वृत्तसंस्था |   गुरुवार, 26 एप्रिल 2018
medal

चंडीगड - बक्षीस रकमेत कपात होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या प्रमुख खेळाडूंनी सत्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याच्या दिलेल्या धमकीमुळे हरियाना सरकारला पदक विजेत्यांसाठी आयोजित केलेला सत्कार सोहळाच रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

चंडीगड - बक्षीस रकमेत कपात होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या प्रमुख खेळाडूंनी सत्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याच्या दिलेल्या धमकीमुळे हरियाना सरकारला पदक विजेत्यांसाठी आयोजित केलेला सत्कार सोहळाच रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६६ पदके मिळवली. त्यातील २२ पदके हरियानातील खेळाडूंची होती. कोणत्याही प्रतिथयश स्पर्धेत पदक मिळवल्यावर हरियाना सरकार पदक विजेत्या खेळाडूंना बक्षीस रक्कम देण्यात आघाडीवर असते. त्यानुसार या वेळीही त्यांनी आघाडी घेतली होती. या पदक विजेत्यांचा जंगी सत्कार करण्याची तयारीही त्यांनी केली होती. परंतु महिला कुस्तीगीर विनेश पोघट, भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॉक्‍सर मनोज कुमार यांनी बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा इरादा नवोदित खेळाडूंनी व्यक्त केला होता. 

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आम्ही सत्कार सोहळा रद्द करत आहोत आणि सध्याच्या क्रीडा धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहोत, असे हरियाना सरकारचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी सांगितले. जे खेळाडू रेल्वे किंवा सेनादलाचे प्रतिनिधित्व करतात; परंतु मूळचे हरियानाचे असल्यामुळे आम्ही त्यांचा अपवाद करत नाही. रक्कम कमी करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे, असेही विज यांनी स्पष्ट केले. अर्थात यानंतरही अंतिम निर्णय बाकी असल्यामुळे पुरस्कार सोहळा लांबणार हे नक्की.

बहिष्काराचे नेमके कारण  हरियाना सरकारने आखलेल्या रचनेनुसार राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्याला १.५० कोटी, रौप्य ७५ लाख आणि ब्राँझपदक विजेत्याला ५० लाख देण्यात येणार होते; परंतु नावाजलेले खेळाडू सेनादल, रेल्वे आदी ठिकाणी नोकरी करतात. तेथूनही त्यांना बक्षीस रक्कम मिळणार आहे. ही बक्षीस रक्कम वजा करून उर्वरित रक्कम देण्यात येईल, असे हरियाना सरकारने जाहीर केले. त्यामुळे तिळपापड झालेल्या या खेळाडूंनी सत्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

जे खेळाडू राज्याकडून खेळतात त्यांनाच रोख रकमेची बक्षिसे देण्याचे धोरण स्पष्ट आहे. जे खेळाडू रेल्वे किंवा सेनादलाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना बक्षिसे देण्याची तरतूद नाही.- अनिल विज, हरियानाचे क्रीडामंत्री

Web Title: Haryana players get double reward

टॅग्स

संबंधित बातम्या

narendra modi
चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी

अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...

पैठण, जि. औरंगाबाद - पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) झाले. या वेळी सुभाष देसाई, नंदकिशोर कागलीवाल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, अतुल सावे, प्रकाश सारवाल,
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी

औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...

औरंगाबाद - अगरबत्तीचे पॅंकिंग करताना दिव्यांग प्रतिष्ठानचे सदस्य.
दिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास

औरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...

Bank
राज्यात घेणार दहा हजार ग्रामसभा

औरंगाबाद - केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणामुळे बॅंकिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. बॅंकांच्या बुडीत कर्जामध्ये (एनपीए) झपाट्याने वाढ होत आहे. अशा...

Desarada
उपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर

औरंगाबाद - राज्यात मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, पालकमंत्र्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दुष्काळाची घोषणा...

ढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला

मनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...