Sections

फुटबॉल ‘क’ गटात अबतक एकाहत्तर....

संदीप खांडेकर |   बुधवार, 21 मार्च 2018

कोल्हापूर - मैदानापासून फारकत घेतलेल्या खेळाडूंची फुटबॉल खेळण्याची हौस फिटता फिटेना, अशी स्थिती आहे. यंदाच्या हंगामात ’क’ गट खुला झाल्याने या गटात  तब्बल एकाहत्तर संघांची नोंदणी झाली.

कोल्हापूर - मैदानापासून फारकत घेतलेल्या खेळाडूंची फुटबॉल खेळण्याची हौस फिटता फिटेना, अशी स्थिती आहे. यंदाच्या हंगामात ’क’ गट खुला झाल्याने या गटात  तब्बल एकाहत्तर संघांची नोंदणी झाली. एकोणीस नवे संघ गटात नोंदणीकृत झाल्याने जुन्या व नव्या दमाच्या खेळाडूंचा मैदानावर कस लागणार आहे. ’क’ गट एकवीस वर्षाखालील खेळाडूंसाठी होता. त्यात खुल्या गटातील सात खेळाडू घेण्याची मुभा होती.

यंदा हा गट खुला झाल्याने फुटबॉलला रामराम ठोकलेल्या खेळाडूंची भरती झाली. गतवर्षी गटात सोळा होती. ती एकाहत्तरवर पोचली आहे. ’ड’ गट एकोणीस, तर ’इ’ गट सतरा वर्षाखालील खेळाडूंसाठी होता. हा गट आता अनुक्रमे सतरा व एकोणीस वर्षाखालील गट म्हणून ओळखला जाईल. या गटाच्या स्वतंत्र पद्धतीने साखळी सामने होतील. ’क’ गटात प्रवेश केलेल्या संघाना ’ब’ व त्यानंतर वरिष्ठ गटात जाण्याची संधी आहे. गेल्या हंगामात जे संघ ड गटात होते. त्यातील चौदा संघ क गटात नोंदणीकृत झाले. विशेष म्हणजे एकोणीस नवे संघ थेट या गटात आले. थेट प्रवेशासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारले गेले. वयाची पंचविशी, तिशी गाठलेले खेळाडू पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. 

नवे १९ संघ असे : फुटबॉल बॉईज  वॅको जॅको स्पोर्टस  संयुक्त जुना बुधवार  सह्याद्री फुटबॉल क्‍लब

साठमारी फ्रेंडस सर्कल  * जय शिवराय तरुण मंडळ * संयुक्त राजेंद्रनगर * महागणपती ग्रुप * चक्रव्यूह तालीम मंडळ * ईगल फुटबॉल क्‍लब * बावडा फुटबॉल क्‍लब * आलोच ग्रुप * ओंकार ग्रुप * नंगीवली तालीम मंडळ * जेएस स्पोर्टस * संयुक्त राजारामपुरी * यूथ क्रिएटिंग चेंज फाऊंडेशन * अभियान तालीम मंडळ * गोरा कुंभार संघ. 

* २०१७ : ड गटातील संघ - १९, इ गटातील संघ - ४० 

अजूनही नोंदणीची उत्सुकता ‘क’ गटासाठी २३ व २४ मार्चला विलंब शुल्क नोंदणीची मुदत आहे. या गटानंतर १७ व १९ वर्षांखालील गटासाठी नोंदणी होईल. या गटात किती संघ सहभागी होतील, याची उत्सुकता आहे. कारण या वयोगटातील खेळाडूंनी ‘क’ गटात नोंदणी केल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Kolhapur News 71 players in Football C Group

टॅग्स

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या विम्यावर कंपन्या मालामाल

सोलापूर : मागील दोन वर्षांत राज्यातील 20 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी रब्बीसाठी पीकविमा भरला. मात्र, त्यापैकी फक्‍त सहा लाख 27 हजार शेतकरीच भरपाईसाठी...

amol udgirkar
बायो'पीक' (अमोल उदगीरकर)

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली....

जीवनात यशस्वी ठरण्यासाठी धावणे आवश्‍यक : हॉल

मुंबई : धावण्यामुळे शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्या आपण अधिक सक्षम बनतो. त्यामुळे मॅरेथॉनपटू जीवनाच्या कणखर प्रसंगांमध्येही कधीच हार मानत नाही...

samir abhyankar
गाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)

शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी...

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

kalsubai
सर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान!

सोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...