Sections

फुटबॉल टर्फ वाचवण्यासाठी वन-डे ठिकाणात बदल

वृत्तसंस्था |   शुक्रवार, 23 मार्च 2018
nehru-stadium-kochi

तिरुअनंतपुरम : विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने तयार झालेले मैदान उखडून त्याऐवजी भारत-वेस्ट इंडीज लढतीची खेळपट्टी तयार करण्याची केरळ क्रिकेट संघटनेची योजना बारगळणार आहे. त्यांनी भारत-विंडीज लढत कोचीऐवजी तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. केरळ क्रिकेट संघटनेने भारत-विंडीज लढत कोचीच्या नेहरू स्टेडियमवर घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे जागतिक दर्जाच्या टर्फला धक्का बसणार होता.

तिरुअनंतपुरम : विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने तयार झालेले मैदान उखडून त्याऐवजी भारत-वेस्ट इंडीज लढतीची खेळपट्टी तयार करण्याची केरळ क्रिकेट संघटनेची योजना बारगळणार आहे. त्यांनी भारत-विंडीज लढत कोचीऐवजी तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. केरळ क्रिकेट संघटनेने भारत-विंडीज लढत कोचीच्या नेहरू स्टेडियमवर घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे जागतिक दर्जाच्या टर्फला धक्का बसणार होता. ही लढत अन्यत्र खेळवण्याची विनंती केरळा ब्लास्टर्सचा सहमालक सचिन तेंडुलकर, ॲटलेटिको डे कोलकताचा सहमालक सौरभ गांगुली, भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री, शशी थरूर यांच्यासह अनेकांनी केली होती. अखेर केरळचे क्रीडामंत्री ए. सी. मोईदीन यांनी यात लक्ष घालून केंद्र बदलण्याचा निर्णय घेतला. वन-डेबाबतचा अंतिम निर्णय केरळ क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सभेत घेण्यात येईल.

Web Title: sports news Thiruvananthapuram save the football turf

टॅग्स

संबंधित बातम्या

Asia Cup 2018 : शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत

दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन...

Rahul Gandhi
मोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी

नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...

rafale deal
सरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा

नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...

मंत्री रावलांकडून नौकानयनपटू मनीषा माळीला एक लाखाची मदत

न्याहळोद (जि. धुळे) : विश्‍वकरंडक नौका नयन ड्रॅगन बोट स्पर्धेत राज्याचे नाव गाजविणारी न्याहळोद (ता. जि. धुळे) येथील जिगरबाज नौकानयनपटू मनीषा...

खेळांच्या प्रोत्साहनासाठी शाळा, कॉलेजना निधी 

कऱ्हाड - खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाकडून निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत...