Sections

'राजस्थान'च्या कर्णधारपदी रहाणे; स्मिथने नेतृत्त्व सोडले

वृत्तसंस्था |   सोमवार, 26 मार्च 2018
File photo of Steve Smith

मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये जाणीवपूर्वक चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्त्व आज (सोमवार) सोडले. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी भारताच्या अजिंक्‍य रहाणेची नियुक्ती झाली आहे. 

मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये जाणीवपूर्वक चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्त्व आज (सोमवार) सोडले. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी भारताच्या अजिंक्‍य रहाणेची नियुक्ती झाली आहे. 

यासंदर्भात राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने आज एक पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली. चेंडू कुरतडण्याच्या प्रयत्नामुळे स्मिथवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका सामन्यासाठी बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळही या प्रकरणी स्वतंत्र कारवाई करणार असून स्मिथसह उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर कायमची बंदी घालण्याची कारवाईही होऊ शकते. 

केप टाऊनमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरुन बॅंक्रॉफ्ट चेंडू खराब करण्याचा प्रयत्न करत असताना टीव्हीवर टिपले गेले होते. 'हा संघाच्या सामूहिक नेतृत्त्वाने जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता' असे स्मिथने पत्रकार परिषदेत कबुल केले होते. यामुळे त्याला कसोटी सामना सुरू असतानाच कर्णधारपदावरून बाजूला होण्याचा आदेश देण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या कसोटीतील शेवटच्या दोन दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व यष्टिरक्षक टीम पेनीने केले होते. 

या पार्श्‍वभूमीवर स्मिथला कर्णधारपदी नियुक्त करणारे राजस्थान रॉयल्सचे संघ व्यवस्थान काय निर्णय घेते, याकडेही लक्ष होते. राजस्थान रॉयल्सचे संचालक झुबिन भरुचा म्हणाले, "केप टाऊनमध्ये झालेल्या त्या प्रकरणामुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍व हादरले आहे. या प्रकरणी आम्ही सातत्याने 'बीसीसीआय'च्या संपर्कात होतो. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही निर्णय घेतला आहे.'' 

"अजिंक्‍य रहाणे हा सुरवातीपासूनच राजस्थानच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याला या संघाच्या संस्कृतीची जाणीव आहे. त्यामुळे या पदासाठी त्याची निवड सर्वार्थाने योग्य आहे'', असेही भरुचा यांनी सांगितले. 

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे.

Web Title: Steve Smith steps down as Rajasthan Royals Captain; Ajinkya Rahane to Lead RR

टॅग्स

संबंधित बातम्या

File photo
भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार

भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...

प्रोव्हिडन्स - विश्‍वकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी पाकिस्तानविरुद्ध अर्धशतकी खेळी करणारी भारताची मिताली राज आकर्षक फटका मारताना.
भारतीय महिलांचा पाकवर विजय

प्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी...

Pune Edition Editorial Article on Cricket
रडीचा डाव (अग्रलेख)

क्रिकेट हा खेळ कोणे एके काळी "सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम...

देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर विराट कोहलीचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने...

congress, bjp
लोकसभेतील भाजपचे संख्याबळ घटले; काँग्रेसचे सदस्य वाढले 

नवी दिल्ली : कर्नाटकमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकांनी सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. पोटनिवडणुकांमधील सातत्यपूर्ण अपयशामुळे मोदी सरकारचे संख्याबळ...

indian coach ravi shastris trolls on social media
बोनस न मिळाल्याने 'रवी शास्त्रीं'चा रेल्वेतून प्रवास

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवाळी बोनस न दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास...