Sections

शास्त्री मूर्खांच्या जगात वावरतोय - गांगुली

वृत्तसंस्था |   गुरुवार, 30 जून 2016

कोलकता - रवी शास्त्रीच्या टीकेने मी व्यथित झालो आहे. तो मूर्खांच्या जगात वावरतो आहे, असे जोरदार प्रत्युत्तर सौरभ गांगुली याने दिले. 

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीची मुलाखत झाली, तेव्हा गांगुली अनुपस्थित होता. यामुळे शास्त्री संतापले. गांगुलीने मुलाखतीला आलेले उमेदवार आणि आपल्या कामाचा अनादर केल्याची टीका शास्त्रीने केली होती. 

कोलकता - रवी शास्त्रीच्या टीकेने मी व्यथित झालो आहे. तो मूर्खांच्या जगात वावरतो आहे, असे जोरदार प्रत्युत्तर सौरभ गांगुली याने दिले. 

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीची मुलाखत झाली, तेव्हा गांगुली अनुपस्थित होता. यामुळे शास्त्री संतापले. गांगुलीने मुलाखतीला आलेले उमेदवार आणि आपल्या कामाचा अनादर केल्याची टीका शास्त्रीने केली होती. 

क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) सदस्य असलेल्या गांगुलीने "दादा‘ला साजेसे प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, की "कुंबळेची नियुक्ती हा समितीचा सामूहिक निर्णय होता. शास्त्रीची टीका वैयक्तिक आहे. मला फार दुःख झाले असून मी निराश झालो आहे. त्याने आणखी थोडी परिपक्वता दाखवायला हवी होती. त्याची निवड न होण्यास मी जबाबदार आहे, असे वाटत असेल तर तो मूर्खांच्या जगात वावरतोय. तो स्वतः अशा समित्यांमध्ये दहा वर्षांहून जास्त काळ आहे. त्यामुळे त्याला जाणीव असायला हवी.‘   

शास्त्री स्वतः मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. ते बॅंकॉकला सहलीसाठी गेले होते. हाच संदर्भ देत गांगुली म्हणाला, ""मलासुद्धा शास्त्रीला एक सल्ला द्यायचा आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षकपद हे एक अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यासाठी निवड होते तेव्हा शास्त्रीने समितीसमोर उपस्थित राहून सादरीकरण करायला हवे होते. बॅंकॉकमध्ये बसून कॅमेरासमोर ते करायला नको होते. कुंबळेसारखा एक महान भारतीय क्रिकेटपटू जवळपास दोन तास वेळ काढत असेल तर हे नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे.‘‘ 

याप्रसंगी गांगुलीने कुंबळेला शुभेच्छा दिल्या. "कुंबळे हा जगातील एक सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. तो महान क्रिकेटपटू आहे,‘ असे गांगुली म्हणाला.

Web Title: Sourav Ganguly hits back at Ravi Shastri

टॅग्स

संबंधित बातम्या

नवा 'बेंचमार्क'!

आपण क्रिकेट ‘पाहणारा’ देश आहोत... क्रिकेट पाहण्यासाठी आपल्याला एका ‘हिरो’ची गरज असते... गेल्या पिढीसाठी हा ‘हिरो’ सचिन होता... या पिढीसाठी ही जागा...

muktapeeth
नेपाळची सायकलसफर

तुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट...

team india
ऑल इज वेल! (अग्रलेख)

साहेबाच्या देशात जाऊन त्यास पंचांग दाखवण्याचे भारतीय स्वप्न विराट कोहलीच्या संघाने पुरे करून दाखवले असते, तर आज गणेशोत्सवात उत्साहाने वाजणारे ढोल-...

Ravi Shastri
शास्त्रीजी, चॅपेल होऊ नका

मायदेशात आणि उपखंडात एकामागून एक विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपली पात्रता काय आहे, हे दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात फार जवळून...

vajpayee listen to sourav ganguly hum honge kamayab
Atal Bihari Vajpayee: हम होंगे कामयाब...

नवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...

bcci and court
‘क्रिकेटसत्ताक’च! (अग्रलेख)

भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशाला एका धाग्यात जोडून ठेवणाऱ्या दोनच गोष्टी या प्रजासत्ताकात आहेत. एक म्हणजे हिंदी सिनेमे आणि दुसरी अर्थातच क्रिकेट!...